Thackeray Vs Shinde : झिरवळांनी पकडले कोंडीत : म्हणाले, 'माझ्यावर अविश्वास तर नार्वेकरांची नियुक्ती योग्य कशी?'

Thackeray Vs Shinde : माझ्या अध्यक्षतेखाली नव्या अध्यक्षांची नेमणूक कशी झाली?
Thackeray Vs Shinde :  Narhari Zirwal : Eknath Shinde
Thackeray Vs Shinde : Narhari Zirwal : Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thackeray Vs Shinde : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली आहे. ही सुनावणी आता २१ व २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र यावर आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते व विधानसभेचे माझी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपाध्यक्ष म्हणून माझ्यावर अविश्वासाचा ठराव आणला होता तर मग माझ्या अध्यक्षेतेखाली झालेली नव्या अध्यक्षपदाची निवड कशी योग्य ठरते? असा सवाल झिरवळ यांनी उपस्थित केला आहे. यामुळे आता झिरवळ यांनी शिंदे गटासाठी अडचणीचा मुद्दा उपस्थित केल्याचे बोलले जात आहे

विधानसभेचे उपाध्यक्ष असताना झिरवळ यांनी शिवसेनेच्या सोळा आमदारांविरूद्ध अपात्रतेची नोटीस पाठवली होती. यावर शिंदे गटाने आक्षेप घेतला होता. उपाध्यक्ष म्हणून नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी आमदारांना अपात्रतेची बजावलेली दोन दिवसांची नोटीस बेकायदेशीर आहे. किमान दहा दिवसांची नोटीस देणे अपेक्षित होतं, असा दावा शिंदे गटाने केला आहे.

Thackeray Vs Shinde :  Narhari Zirwal : Eknath Shinde
Shashikant Warise News : पत्रकार वारीशे प्रकरणावर राऊतांचे दोन महत्वाचे सवाल; एकाचवेळी...

शिंदे गटाच्या याच दाव्यावर झिरवळ यांनी प्रतिप्रश्न केला आहे. झिरवळ म्हणाले, “अपात्रतेची जर सात दिवसांपर्यंत नोटीस दिली जाते. त्यांना दोन दिवसांची नोटीस दिली गेली असेल तर, संबंधित आमदारांनी आपल्याकडे मुदतवाढीची मागणी करायला हवी होती, अशी कायद्यात तरतूद देखील आहे. तसेच जर विधानसभेचा उपाध्यक्ष पदावर असताना माझ्यावर अविश्वास ठराव आणला गेला होता, तर मग माझ्याच अध्यक्षतेखाली झालेली नव्या विधानसभा अध्यक्षांची निवडही चुकीची ठरते का? असा प्रश्न झिरवळ यांनी उपस्थित केला आहे.

माझ्यावर अविश्वास प्रस्ताव आणला गेल्यामुळे मी बजावलेली नोटीस बेकायदेशीर असल्याची त्यांचे म्हणणे आहे. पण नियमानुसार अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांवर केवळ एका नोटीशीने अविश्वास आणता येत नाही. साध्या सरपंचावर देखील अविश्वास आणायचा असेल तर नोटीस द्यावी लागते. या नोटीशीची पडताळणी होते. या सर्व कार्यवाहीनंतर ज्यांच्यावर अविश्वास दाखल केला गेला आहे, त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले जाते.

Thackeray Vs Shinde :  Narhari Zirwal : Eknath Shinde
Kasaba By Election : प्रचारात सहभागी झालेल्या बापटांची पवारांना काळजी ; म्हणाले, "बापटांच्या यातना.."

माझ्यावर जर का अविश्वास प्रस्ताव दाखल करायचा असेल, तर ते विधिमंडळाच्या सभागृहातच मांडले जाऊ शकते, तरच असा अविश्वास प्रस्ताव दाखल केला जाऊ शकतो. मी जेव्हा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर असतो, तेव्हा आपल्यासमोर कोणताही गट-तट नसतो. कोणत्याही पक्षासाठी मी उपाध्यक्षच असतो, असे झिरवळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com