Shashikant Warise News : पत्रकार वारीशे प्रकरणावर राऊतांचे दोन महत्वाचे सवाल; एकाचवेळी...

Sanjay Raut : ''यामागे कोण-कोण आहे? याचा शोध घेण्यात यावा...''
Shashikant Warise News
Shashikant Warise NewsSarkarnama
Published on
Updated on

Shashikant Warise news Update: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या संशयास्पद मृत्यूवरून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर राज्य सरकारने शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची घोषणा केली.

यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वारिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर आता राऊतांनी या प्रकरणावर दोन महत्वाचे सवाल उपस्थित केले आहेत. राऊत म्हणाले, ''वारीशे  यांची हत्या झाली. मात्र, हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. सरकारने एसआयटी नेमली आहे. पण एसआयटीचा तपास निःपक्षपाती होईल का? अशी शंका आहे'', असं ते म्हणाले.

Shashikant Warise News
CM On Koshyari : मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्राला कोश्यारींची ओळख ‘या’ कारणांमुळे कायम राहील’

''महत्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी वारीशे यांना चिरडण्यात आलं. तेथील पेट्रोल पंप आणि त्या परिसरातील आजू-बाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे एकचवेळी बंद कसे? तसेच यामागे कोण-कोण आहे? याचा शोध घेण्यात यावा'', असं म्हणत त्यांनी हे दोन महत्वाचे सवाल उपस्थित केले. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

Shashikant Warise News
Shashikant Warishe News : दहा बाय दहाचे घर, एकही गुंठा जमीन नाही; वारीशेच्या कुटुंबाची वस्तुस्थिती

पुढे राऊत म्हणाले, ''तरुण पत्रकारला अशा प्रकारे मारण्यात आलं. हे धक्कादायक आहे. खरं तर कोकणाने महाराष्ट्राला आणि देशाला प्रमुख पत्रकार दिले. त्यामध्ये टिळक, जांभेकर हे कोकणातले आहेत. मग याच भूमीत तरुण पत्रकाराने मांडलेल्या भूमिका कुणाला पटत नाही त्यामुळे त्याला गाडीखाली चिरडून टाकण्यात आलं, हे दुर्देवी आहे'', असं ते म्हणाले.

Shashikant Warise News
Shashikant Warise : 'तो पूर्वनियोजित कटच'; पत्रकार वारीसे हत्या प्रकरणातील आरोपीची कबुली

''मात्र, ही हत्या साधी नाही. लोकांची भूमिका मांडणारा पत्रकार असा चिरडला जातो. त्यामागे कोण-कोण आहे? याचा तपास निःपक्षपाती पणे करण्यात यावा. यामध्ये काहीतरी राजकीय षडयंत्र आहे. कारण शशिकांत हा रिफायनरीच्या विरोधात लिहित होता. त्यामुळे यामधूनच ही हत्या झाली'', असा आरोप यावेळी संजय राऊतांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com