Bogus Voters Thane : 'बोगस मतदार यांद्यामध्ये घुसवले तर याद राखा, थेट अधिकाऱ्यांच्या घरासमोरच राडा'; ठाकरेंच्या शिलेदारानं निवडणूक आयोगालाच ठणकावलं

Rajan Vichare Warns of Protest Over Bogus Voters in Thane Election : ठाणे महापालिकेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
Rajan Vichare Warns
Rajan Vichare WarnsSarkarnama
Published on
Updated on

Thane voter list issue : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बोगस मतदारांचा मुद्दा चांगलाच तापणार असल्याचे दिसते आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसह विरोधकांनी बोगस मतदारांवर काम करण्यास सुरूवात केली आहे. यात सर्वाधिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सावध आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि कोकण पट्ट्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या याद्यांची चाळणी करून घेत आहे. यात ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे सेना पक्ष मतदार यांद्यांबाबत अलर्ट झाला आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीला माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने नियोजन सुरू केलं आहे. मतदार यांद्यांपासून हे नियोजन सुरू आहे. राजन विचारे यांनी काल पत्रकार परिषद घेत, मतदार यांद्यांमधील बोगस मतदारावरून थेट संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. त्यांचा हा इशारा म्हणजे, अप्रत्यक्षपणे निवडणूक आयोगालाच होता.

माजी खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी, 'लोकसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी मतदारांच्या यादीत बोगस (खोटी) नावे टाकण्याचा प्रयत्न झाल्यास, संबंधित अधिकाऱ्याच्या घराबाहेर जाऊन आंदोलन करू,' असा इशारा दिला आहे.

Rajan Vichare Warns
Kala Kendra Jamkhed : भगव्या उपरण्यांमागे तोंड लपवली, हातात तलवारी अन्..; कला केंद्रावर सलग तीन दिवसांपासून टारगटांचा राडा

दीडशे अधिकाऱ्यांच्या चौकशीचा आदेश

माजी खासदार विचारे यांनी म्हटले की, "गेल्या साडेतीन वर्षांत ठाण्यात मुख्यमंत्री असूनही महापालिका लुटली गेली. 5,645 कोटींच्या बजेटपैकी केवळ 30-35 कोटी रुपयेच शिल्लक आहेत. महापालिका भ्रष्टाचारात राज्यात अव्वल ठरली असून, उच्च न्यायालयाने सुमारे दीडशे अधिकाऱ्यांच्या चौकशीचा आदेश दिले आहेत." तसेच, चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याला प्रमोशन देणे लज्जास्पद आहे. नागरिक फसवले गेल्यास शांत बसणार नाही, असा इशाराही राजन विचारे यांनी दिला.

Rajan Vichare Warns
Congress MLA betting scam : मोठी बातमी! काँग्रेस आमदाराचा ऑनलाईन बेटिंग प्रकरणात 2000 कोटींचा व्यवहार; परदेशापर्यंत नेटवर्क

टँकर माफियांमुळे पाणीटंचाई

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 'महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. महापालिकेत मनसेची सत्ता आल्यास या भ्रष्टाचाराची चौकशी लावणार. ठाणे शहराला अजूनही स्वतःचे धरण नसून टँकर माफियांमुळे पाणीटंचाईचा त्रास नागरिकांना होत आहे,' याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं.

बाळासाहेबांनी ओरिजनल फौज रस्त्यावर उतरणार...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि मनसे ठाणे महापालिकेतील गैरव्यवहार, पाणीटंचाई आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर सोमवारी संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली. गडकरी रंगायतन इथून सायंकाळी चार वाजता हा मोर्चा महापालिकेवर धडकणार आहे. अविनाश जाधव यांनी सांगितले की, 'हा पहिला मोर्चा नसेल. बाळासाहेबांनी ओरिजनल फौज ठाण्याच्या रस्त्यावर उतरणार आहे आणि आता यापुढे निवडणुका पैशावर नव्हे, तर कामावर आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर होईल.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com