Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदे एकाच दगडात दोन पक्षी मारणार, विधान परिषदेसह ठाणे जिल्हा बँकही ताब्यात घेण्याच्या तयारीत...

Thane District Central Cooperative Bank : मागील वेळी हितेंद्र ठाकूर यांच्या पॅनलच्या विरोधात जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांचे पॅनल उभे होते. त्यावेळी शिंदे आव्हाड यांच्या पॅनलला २१ पैकी फक्त ३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत रंगत येणार आहे.
Thane DCC Bank Election 2026 | Hitendra Thakur | Eknath Shinde
Thane DCC Bank Election 2026 | Hitendra Thakur | Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane DCC Bank Election 2026 : दि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कार्यक्रम जाहीर केला आहे.

गेल्या वेळी हितेंद्र ठाकूर यांच्या पॅनलच्या विरोधात जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांचे पॅनल उभे होते. त्यावेळी शिंदे आव्हाड यांच्या पॅनलला २१ पैकी फक्त ३ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत रंगत येणार आहे. बदलत्या राजकीय समीकरणात कोण कोणाच्या बरोबर जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सद्यस्थितीत बहुजन विकास आघाडीचे राजेंद्र गोपाळ पाटील हे बँकेचे चेअरमन असून बँकेवर माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची पकड आहे. बदलत्या राजकीय समीकरणात ठाकूर यांची बँकेवरील पकड सैल करण्यासाठी भाजप प्रणित सहकार भारती व अन्य राजकीय गट प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे.

Thane DCC Bank Election 2026 | Hitendra Thakur | Eknath Shinde
Shivsena Politics : राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र; शिवसेनेच्या 'या' नेत्याचा पत्ता कट होणार?

मात्र, दुसरीकडे ठाणे विधान परिषदेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विधान परिषदेत मतांची गोळाबेरीज करण्यासाठी बहुजन विकास आघाडीला उमेदवारी देण्याची तयारी शिंदेंनी दर्शवली असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. त्यामुळे रवींद्र फाटक यांना डावलून त्यांच्या जागी बविआचे क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी देत शिंदे पुन्हा एकदा राज्यसभेप्रमाणे धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता आहे.

ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपकडे तब्बल ४४४ मतांचे संख्याबळ आहे. तर शिवसेना आणि निलेश सांबरे गटाची मिळून ३४६ मते आहेत. त्यामुळे आकड्यांच्या गणितात भाजप स्पष्टपणे वरचढ ठरत आहे. भाजपला मागे टाकून इथे विजय मिळवायचा असल्यास शिवसेनेसाठी राजकीय समीकरणे जुळविण्याचे मोठे आव्हान आहे. तर इथे बहुजन विकास आघाडीकडे ७१ मते आहेत.

Thane DCC Bank Election 2026 | Hitendra Thakur | Eknath Shinde
PMC : ...तर 'त्या' एक हजार कर्मचाऱ्यांवर पुणे महापालिका गुन्हे दाखल करणार!

त्यामुळे शिंदेंनी बविआला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. शिवाय शिंदेंची ही खेळी यशस्वी ठरल्यास ठाणे जिल्हा बँक आणि विधान परिषद दोन्ही शिवसेना आपल्या ताब्यात ठेऊ शकते. मात्र या सर्व राजकीय चर्चांमध्ये माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, निवडणुकीच्या अनुषंगाने, प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २५ मे २०२६ ते २ जून २०२६ अशी राहणार आहे. अर्जाची छाननी ३ जून रोजी होणार असून, वैध उमेदवारांची यादी त्याच दिवशी सायंकाळी प्रसिद्ध केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १७ जूनपर्यंत देण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया २७ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडणार असून, मतमोजणी २८ जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गुरुकृपा हॉल, दुसरा मजला, सर्वश्री गुरुकृपा को-ऑप. हौसिंग सोसायटी, गावदेवी मैदान रोड, नौपाडा, ठाणे येथे निश्चित करण्यात आले आहे. या निवडणुकीत विविध मतदारसंघांमधून प्रतिनिधी निवडले जाणार असून, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, तसेच विविध कार्यकारी व औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती नोटीस बोर्ड तसेच www.thanedistricbank.com rotdcc@gmail.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत दोन टर्म संचालक राहिलेल्यांना नव्या कायद्यानुसार निवडणूक लढविता येणार नाहीए. त्यामुळे यावेळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com