Lok Sabha Election: ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सवाची लगबग; दिघेंच्या कोणत्या शिष्यावर होणार अंबे मातेची कृपा?

Eknath Shinde Vs Rajan Vichare: ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. टेंभीनाक्यावर दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी नवरात्रोत्सव सुरू केला. काही वर्षात त्याची ख्याती महाराष्ट्रात नाहीतर देशभरात पसरली आहे. त्यांच्या पश्चातही ती परंपरा कायम आहे.
Eknath Shinde, Rajan Vichare
Eknath Shinde, Rajan VichareSarkarnama

Thane Lok Sabha Election 2024: राज्याच्या राजकारणात ठाणे केंद्रस्थानी आले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीमुळे ठाणे असो किंवा कल्याण या मतदारसंघांमुळे ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे हॉटस्पॉट बनले आहे. एकीकडे ठाकरे गटाने ठाण्यात उमेदवार जाहीर करत कल्याणला वेट अँड वॉचवर ठेवले आहे. तर शिंदे गटाने दोन्ही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यापेक्षा अनोखी खेळी खेळून 'सस्पेन' वाढवला आहे.

अशातच, ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सवाची (Chaitra Navratri festival) लगबग सुरू झाली असून त्यानिमित्ताने शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटात चढाओढ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिवंगत शिवसेना ठाणे (Thane) जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान खासदार राजन विचारे हे दोघेही आहेत. मात्र, ठाणे लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात जर राजन विचारे (Rajan Vichare) विरुद्ध शिंदे गट अशी लढत झाल्यास अंबे मातेची कृपा कोणावर होणार हे लवकरच स्पष्ट होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

टेंभीनाक्यावर दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी नवरात्रोत्सव सुरू केला. काही वर्षात या उत्सवाची ख्याती महाराष्ट्रात नाहीतर देशभरात पसरली आहे. त्यांच्या पश्चातही ती परंपरा कायम आहे. त्यातच टेंभीनाक्यावरील अंबे मातेची छब्बी सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. मग, नवरात्रोत्सव असो या चैत्र नवरात्रोत्सव असो या उत्सवात टेंभीनाक्यावरील अंबे मातेसारखीच छब्बी पाहण्यास मिळत आहे. राजन विचारे हे गेल्या 15 वर्षांपासून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील 10 वर्षांपासून कोपरी पूर्व येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सव तितक्याच ताकदीने साजरा करतात. मात्र सध्या परिस्थितीत बदल झाल्याने दोघेही शिष्य राजकीय विरोधक बनले आहेत. हे वारंवार ठाणेकर नागरिकांना पाहण्यास मिळत आहेत.

Eknath Shinde, Rajan Vichare
Lok Sabha Election 2024 : एकनाथ शिंदे लोकसभेचा एक उमेदवार बदलणार; तो उमेदवार मराठवाडा की पश्चिम महाराष्ट्रातील?

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार विचारे हे दिघे यांचे शिष्य असल्याचे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'धर्मवीर' चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांना पाहण्यास मिळाले. यामध्ये दिघे यांच्या एका शब्दावर विचारे यांनी ठाणे महापालिका सभागृह नेतेपद सोडून ते पद शिंदे यांना बहाल केल्याचे पाहण्यास मिळाले. पण, शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होत आहे. यानिमित्ताने विचारे आणि शिंदे हे परस्पर विरोधक आहेत.

Eknath Shinde, Rajan Vichare
Kalyan Lok Sabha Election: श्रीकांत शिंदेंचे नाव निश्चित? उमेदवारी जाहीर होण्याआधीच विजयाचा संकल्प

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) 'मे'महिन्यात होत असली तरीही एप्रिल महिन्यात आलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात दिघे यांनी घालून दिलेल्या रूढी परंपरानुसार त्यांचे दोन्ही शिष्य ती जपताना दिसत आहे. दिघे यांच्याप्रमाणे देवीचे पाटपूजन असो किंवा मंडप तसेच आगमन आणि विसर्जन मिरवणूक ही त्याच पद्धतीने काढली जात आहे. जशी दिघे यांच्या मनात देवीचे स्थान आणि श्रद्धा तसेच भक्तीभाव होता. तशी श्रद्धा आणि भक्तीभाव त्यांच्या शिष्यांमध्ये पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात अंबे मातेची कोणावर कृपा होणार हे पाहावे लागणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com