ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेची आहे, यासाठी शिवसेना आग्रही आहे. तरीही ही जागा शिवसेना लढणार की भाजप लढणार? हे अद्यापही निश्चित झाले नसल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे ठाणेदारांमध्ये अद्याप संभ्रम असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे या जागेसाठी रवींद्र फाटक यांचे नाव जाहीर झाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. पण प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्याने ट्रिपल इंजिनच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचे फाटक बंद झाले की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
आमदार सरनाईक (Pratap Sarnaik) यांना ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या (Thane Loksabha Constituency) जागेवरून प्रश्न विचारण्यात आला. लोकसभेच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या तिन्ही नेत्यांसह दिल्लीतील वरिष्ठ नेतेमंडळी निर्णय घेणार आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला बंधनकारक असणार आहे.
पहिला प्रश्न हा आहे की, ठाणे लोकसभा शिवसेना (Shivsena) लढणार की भाजप (BJP) हे अद्यापही निश्चित झालेले नाही. मात्र, शिवसेनेची जागा असल्याने ती जागा शिवसेनेलाच मिळावी, यासाठी शिवसेना आग्रही आहे, असे सरनाईक म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय ठरलेल्या धोरणानुसार 2022 मध्ये शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या, तर भाजपने 26 जागा लढवल्या होत्या. परंतु मध्यंतरी एक मित्रपक्ष वाढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कोणाच्या कोट्यातून किती जागा द्याव्यात, हा निर्णयही वरिष्ठ घेणार आहेत. पण ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर आमचा निश्चित दावा आहे. याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असेही सरनाईक यांनी या वेळी स्पष्ट केले. सरनाईक यांच्या वक्तव्याने ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत अद्यापही शिवसेना आणि भाजपमध्ये संभ्रमाची स्थिती असल्याचे चित्र आहे.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.