Thane Mahayuti Rift : महायुतीतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर, भाजप आमदारांना 'त्या' कार्यक्रमातून डावलले? उपमहापौरांनाही निमंत्रण नाही

BJP Vs Shivsena : ठाण्यातील विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे तसेच स्वतः उपमहापौर यांनाच निमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावा करण्यात आला होता.
The absence of invitations to BJP MLAs for a development works inauguration programme has sparked fresh discussions over differences within the Mahayuti alliance in Thane.
The absence of invitations to BJP MLAs for a development works inauguration programme has sparked fresh discussions over differences within the Mahayuti alliance in Thane.Sarkarnama
Published on
Updated on

Thane Politics : ठाणे पालिका क्षेत्रातील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमांवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत. शहरात रविवारी पार पडलेल्या सात विकास प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यांमध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला आहे.

या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन पुन्हा आयोजित करण्याची मागणी केली आहे.

उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेत शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता असताना केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या निधीतून पूर्ण झालेल्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी महायुतीतील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे अपेक्षित होते. मात्र, भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे तसेच स्वतः उपमहापौर यांनाच निमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

यापूर्वी कोपरी परिसरातील प्रसूतिगृहाच्या उद्घाटनावेळीही भाजपच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या प्रकरणी १ जुलै रोजी महापालिका प्रशासनाकडे लेखी निवेदन दिल्यानंतरही अशीच घटना पुन्हा घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

The absence of invitations to BJP MLAs for a development works inauguration programme has sparked fresh discussions over differences within the Mahayuti alliance in Thane.
Maharashtra Politics Live Update : 'देवाच्या इच्छेने, मी मंत्रिमंडळातून बाहेर' : माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार

रविवारी शहरातील सात विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाल्याची माहिती अधिकृत निमंत्रणाऐवजी फेसबुकच्या माध्यमातून मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे भाजपच्या लोकप्रतिनिधींना नियोजनपूर्वक उद्घाटन कार्यक्रमांपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप करत, संबंधित सातही प्रकल्पांचे पुन्हा उद्घाटन आयोजित करण्यात यावे आणि ते भाजपचे आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत पार पाडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या घडामोडींमुळे ठाण्यातील महायुतीतील समन्वयाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली असून, उपमहापौरांच्या पत्रावर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

The absence of invitations to BJP MLAs for a development works inauguration programme has sparked fresh discussions over differences within the Mahayuti alliance in Thane.
Maharashtra bypoll trends : कुठे माणुसकी जिंकली, तर कुठे राजकीय ईर्षा! महाराष्ट्रातील 12 वर्षांतील पोटनिवडणुकांचा 'ग्राफ' नेमका काय सांगतो?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com