Thane Municipal News : आर्थिक कोंडीतही उधळपट्टी; महापालिकेची पदाधिकाऱ्यांना नव्या गाड्यांची भेट!

Thane Municipal Corporation : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना कार खरेदीवर पैसे उधळले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केली आहे. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते यांच्या दिमतीला आता नवीन गाड्या असणार आहे.
Thane Municipal Corporation
Thane Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

Thane News : एकीकडे विकासकामांसाठी निधीची कमतरता आणि ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना ठाणे महापालिकेची प्रमुख लोकप्रतिनिधींच्या नव्या गाड्यांवर उधळपट्टी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर उपमहापौर, सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेते यांच्या दिमतीला महिंद्रा कंपनीच्या नव्या गाड्या दाखल झाल्या आहेत. एका वाहनाची किंमत सुमारे १६ लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. महापौरांसाठी टोयोटा इनोव्हा गाडी मंजूर करण्यात आली असून तिचा ताबा अद्याप मिळालेला नसल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यापूर्वी या पदाधिकाऱ्यांकडे २०२१ मध्ये खरेदी करण्यात आलेली वाहने होती. त्यामध्ये उपमहापौर, सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेते यांच्यासाठी होंडा सिटी, तर महापौरांसाठी ह्युंदाई कंपनीचे वाहन उपलब्ध करून देण्यात आले होते. ही वाहने जुनी झाल्याने नव्या पदाधिकाऱ्यांसाठी नवीन वाहनांची खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

त्यानुसार उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृहनेते हणमंत जगदाळे आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना बुधवारी नवीन गाड्या सुपूर्द करण्यात आल्या. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यासाठीची टोयोटा इनोव्हा लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. ठाणे महापालिकेच्या नियमानुसार महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते आणि स्थायी समिती सभापती या पदाधिकाऱ्यांना अधिकृत वाहनाची सुविधा दिली जाते.

Thane Municipal Corporation
Chhagan Bhujbal : नाशिक शहर वाऱ्यावर सोडलंय का? भुजबळ कुंभमेळा मंत्र्यांपासून आयुक्तांपर्यंत सगळ्यांवर संतापले, फडणवीसांसमोर मांडणार मुद्दा

सध्या स्थायी समिती सभापतीची निवड झालेली नसल्याने चार प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच ही सुविधा उपलब्ध आहे. प्रत्येक वाहनासोबत चालकाची सुविधाही देण्यात आली असून चालकांचे वेतन, वाहनांचा इंधन खर्च आणि देखभालीचा खर्चही महापालिकेच्या तिजोरीतूनच केला जाणार आहे.

गटनेत्यांनाही मिळणार वाहन

ठाणे पालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनंतर आता विविध पक्षांच्या गटनेत्यांनाही अधिकृत वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नवीन वाहने खरेदी केली जाणार नाही. त्यांना सध्या पदाधिकाऱ्यांकडे असलेली जुनी वाहने देण्यात येणार आहेत. या वाहनांसाठी चालक, इंधन आणि देखभालीचा खर्चाचा भारही पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.

Thane Municipal Corporation
SIR form verification Status : SIR फॉर्म भरलात, आता पुढे काय? तुमचे सबमिशन झाले की नाही; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com