Thane News : ठाण्यात भाजपचे 'शिंदेंना' दुहेरी आव्हान! नाईकांचे शिलेदार महापालिकेत करणार 'आरपार' कोंडी

BJP | Thane : भाजपने पालिका मुख्यालयात जनता दरबार भरवण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जागा आणि वेळ देण्याची विनंती करणारे पत्र पालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे.
Thane Municipal Corporation, Eknath Shinde
Thane Municipal Corporation, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यात आता दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी यापूर्वीच ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे. आता भाजपने शहर पातळीवरही शिंदेंची कोंडी करण्यासाठी डाव टाकला आहे. आता भाजपने पालिका मुख्यालयात जनता दरबार भरवण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना जागा आणि वेळ देण्याची विनंती करणारे पत्र पालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार भरवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या उपक्रमाला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने जन संवाद सुरू केला आहे. आठवड्याच्या मंगळवारी आनंदाश्रम आणि गुरुवारी पालिका मुख्यालयात शिंदे गटाचे पदाधिकारी जनतेच्या तक्रारी ऐकत आहेत. सुरुवातीला त्यासाठी त्यांनी पालिकेची कोणतीच परवानगी घेतली नव्हती. ही बाब पालिकेच्या लक्षात आल्यानंतर शिंदे गटाला प्रशासनाने परवानगीसह जागा उपलब्ध करून दिली.

Thane Municipal Corporation, Eknath Shinde
Sharad Pawar Party : शरद पवारांच्या पक्षात मोठी घडामोड; जयंत पाटलांकडून प्रवक्त्यांचे पॅनेल बरखास्त

पण एका ठराविक राजकीय पक्षालाच जागा देण्यावरून आक्षेप नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानेही जनता दरबार भरवण्यासाठी पालिकेकडे परवानगी मागितली. त्यापाठोपाठ भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनीही महापालिकेकडे जनता दरबारासाठी परवानगी मागितली आहे. महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात येऊन सव्वा दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्या पार्श्वभूमीवर जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी आठवड्यातून एक दिवस दुपारी 2 ते 5 पर्यंत जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

Thane Municipal Corporation, Eknath Shinde
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानविरोधात भारताचं युद्धाच्या दिशेनं मोठं पाऊल, शस्त्रसंधी रद्द करण्याच्या हालचाली?

ठाणे शहरातील नागरिकांकडून महापालिकेसंदर्भात अपुरा पाणीपुरवठा, जादा कर आकारणी, मल:निस्सारण, स्वच्छता आदींसह विविध तक्रारी येत असतात. भाजपच्या माजी नगरसेवकांच्या संपर्कात शहरातील हजारो नागरिक आहेत. त्यांच्या तक्रारींचे महापालिकेकडून निवारण तातडीने होण्याची गरज आहे. सद्यःस्थितीत माजी नगरसेवकांकडून पत्रव्यवहार, संवादातून प्रश्न मार्गी लावले जातात. पण महापालिका मुख्यालयात जनता दरबार घेतल्यास नागरिकांचे प्रश्न वेगाने सुटू शकतील, असे संजय वाघुले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com