Sharad Pawar News : ''...त्यामुळे दौरा सोडून हात दाखवायला मी कधीच ज्योतिषाकडे जात नाही!''; पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

Sharad Pawar : मी काही ज्योतिषी नाही, त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या भवितव्याबद्दल काही सांगू शकणार नाही.
eknath shinde, sharad pawar
eknath shinde, sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या दाव्यांमुळे खरंच हे सरकार आपला अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार का याबाबद्दल सातत्याने शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण कसा प्रतिदावा शिंदे गटासह भाजपकडून करण्यात येत आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या भवितव्याविषयी जाणून घेण्यासाठी सिन्नर येथे एका ज्योतिषाची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आहे. (Sharad Pawar Latest News)

eknath shinde, sharad pawar
Sharad Pawar : कोश्यारींबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया ; पवार म्हणाले, "पंतप्रधान, राष्ट्रपतींनी.."

शरद पवार ( Sharad Pawar) यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड अटक, श्रद्धा वालकर हत्या, राज्यपालांचं विधान यांसारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नर येथे एका ज्योतिषाची भेट घेतली यावर बोलताना पवार म्हणाले, मी काही ज्योतिषी नसून त्यामुळे सरकारच्या भवितव्याबद्दल काही सांगू शकणार नाही. तसेच माझा ज्योतिषावर विश्वासही नाही, त्यामुळे मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. महाराष्ट्रात सध्या या गोष्टी नव्याने पाहायला मिळत आहे. याआधी असं कधी होत नव्हतं असा चिमटा देखील पवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना काढला.

eknath shinde, sharad pawar
Bhokardan : आमदार चहा, तसा खासदार चहा येणार, तो भारी असेल ; दानवेंची टोलेबाजी..

राज्यपालांचं शिवरायांबद्दल चांगलं विधान म्हणजे उशिराचं शहाणपण...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आधी वादग्रस्त विधान केल्यानंतर पुन्हा त्यांनी कौतुकोद्गार देखील काढले आहेत.यावर बोलताना पवार म्हणाले, राज्यपाल ही एक संस्था असून त्याच्या काही मर्यादा आणि बंधनं असतात. मात्र, छत्रपतींचा उल्लेख करताना कोश्यारींनी सगळ्या मर्यादा सोडल्या. त्या प्रकरणानंतर त्यांचं छत्रपतींबद्दल चांगलं विधान आलं. पण सगळ्या प्रतिक्रियांनंतर केलेलं हे विधान म्हणजे उशिराचं शहाणपण आहे असंही पवार म्हणाले. तसेच राज्यपालांच्या विषयात आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी लक्ष घालावं असं सूचक विधानही पवारांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com