Dhananjay Munde News : ''राह में खतरे कितने भी हो...''; धनंजय मुंडेंनी सत्ताधारी भाजपला ललकारलं...

NCP News : '' आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल...''
Dhananjay Munde News
Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समोर आज संकटं भरपूर आहेत. महाविकास आघाडी आहे, वातावरण सरळ आहे. पण सत्ताधारी पक्षाकडून प्रयत्न बरेच सुरु आहेत. वंचित बहुजन आघाडी काय करायचं, तेलंगणाची बीआरएस आणायचीय. पण हे सर्व जरी सुरु असलं तरी एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी. '' राह मे खतरे कितने भी हो, डरता कौन है; मौत कल आनी है, आज आजाए, डरता कौन है; तेरे लष्कर के मुकाबिल, मैदान में अकेला हूँ मै, देखता हूँ मरता कौन है...अशी शेरेबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार धनंजय मुंडेंनी सत्ताधारी भाजपला आव्हान दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) च्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद हाँल येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ते बोलत होते. मुंडे म्हणाले, नऊ तारखेला अहमदनगरला भव्य सभा आयोजित करण्यात आला होता. पण मोठ्या पावसामुळे तो कार्यक्रम रद्द करावा लागला. पण २१ ला जूनला मेळावा घेण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं समाजकारण, राजकारण वयाच्या ५५ व्या वर्षी करणं सोपं नाही.

Dhananjay Munde News
Uddhav Thackeray Security News : शिंदे सरकारचा उद्धव ठाकरेंना धक्का; कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात...

धनंजय मुंडे म्हणाले, अजितदादा, भलेही तुमच्या खांद्यावर सध्या पक्षाची कुठली जबाबदारी नसेल. पण तुम्ही अथक परिश्रमातून पक्षातील प्रत्येक बंधू भगिनीला सांभाळण्याचं काम तुम्ही केलं असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

यानंतर ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जरी २५ व्या वर्षात पदार्पण करत असला आणि शरद पवार हे ५५ वर्षातून ५६ व्या वर्षात कारकीर्द सुरु केली आहे. पण त्यांच्यासह व्यासपीठावरील सर्वच नेतेमंडळींची वयं काय यापेक्षा त्यांच्या कामाचा झपाटा हा तरुणांना लाजवेल असा आहे. म्हणून सर्वाधिक तरुणांचा पक्ष जर राज्यात कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असंही धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) म्हणाले.

Dhananjay Munde News
Dhnanjay Munde Letter To Cm News : परदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा प्रस्ताव तात्काळ मान्य करा..

आज संकटं आपल्यासमोर कमी नाहीत. दोन दिवसांपूर्वी न्यूज एरेना इंडिया सर्व्हेमुळे माझ्या मतदारसंघातील आमदार घाबरले आहेत. पण सत्ताधारी पक्षाला हे कुणीतरी विचारणं गरजेचं आहे की, हे न्यूज एरेना इंडिया कुणाचं आहे. पण ते भाजपचं आहे. सध्या अशा सर्व्हेच्या माध्यमातून विरोधकांना घाबरवण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. नाथाभाऊंना माझ्यापेक्षा भाजपचा जास्त अनुभव आहे असा टोलाही मुंडे यांनी यावेळी लगावला.

रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करत असताना आपण सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की, आगामी काळात महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष म्हणून महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असेलच शिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही आपल्याच पक्षाचाच असेल असंही धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी मुंडे म्हणाले, एकेकाळी तुमच्या ठिकाणी बसणारा कार्यकर्ता आज व्यासपीठावर वरिष्ठ नेता म्हणून बसला आहे. हे फक्त शरद पवारां(Sharad Pawar) सारखं नेतृ्त्वच करु शकतं असे गौरवोद्गार मुंडे यांनी काढले. त्यामुळे राजकारणात उज्वल भविष्य जर तरुणांचं कुठल्या पक्षात असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे.

Dhananjay Munde News
Eknath Khadase on BJP : मणिपूरमध्ये आगडोंब सुरु आहे; मोदी का बोलत नाहीत, खडसेंचा सवाल

आज जात-पात, धर्म यांच्यात लढाई सुरु आहे. जाती जातीत तेढ निर्माण केली जातेय.धर्माधर्मात तेढ निर्माण केली जात आहे. अमरावतीत घडलेल्या घटनेचं पडसाद कोल्हापूरात उमटत आहे. या पाठीमागचं कारण काय. केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला माझा एक सवाल आहे की, जर तुम्हांला हिंदुत्वाचा इतका कळवळा आहे तर कुणीतरी सांगावं की, ९०० वर्ष या देशात मुघलांनी राज्य केलं तरी हिंदु धर्म टिकून राहिला अखंडित राहिला आणि वाढला.

त्याकाळात कधी कुणाला हिंदु धर्म टिकावा म्हणून मोर्चे काढण्याची वेळ आली नाही. मग जो १० वर्ष सत्तेत असणारा आणि हिंदु हित की बात करेगा वही देश पर राज करेगा म्हणणार्यांच्या काळात हिंदुंचेच मोर्चे जर निघत असतील तर सुरक्षित कोण आहे हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे असंही मुंडे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.