

Thackeray Family Security News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षेत राज्य सरकारकडून कपात करण्यात आली आहे.
राज्याच्या गृह खात्याकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सुरक्षा यंत्रणेत कपात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साधारणपणे 60 ते 70 पोलीस (Police) अधिकारी व कर्मचारी ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत होते. मात्र, आता या सर्वांनाच कमी करून पुन्हा पहिल्या जागेवर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याआधी उद्धरे ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा होती. तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती. मात्र, आता त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅन कमी केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची सुरक्षा राज्य सरकारने कमी केल्यामुळे या मुद्यावरुन राज्यात राजकारण रंगण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे.
ठाकरे कुटुंबियांसह 'मातोश्री' च्या परिसरातील सुरक्षा देखील कमी करण्यात आली आहे. 'मातोश्री'वर मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही गेटवर पोलीसांचा पहारा असायचा. मात्र, आता ती सुरक्षा कमी करण्यात आली.
कोणतही सरकार असुद्या 'मातोश्री'ची सुरक्षा ठेवली होती. आता 'मातोश्री'वरील सुरक्षा कमी केली आहे. एवढंच नाही तर ठाकरे कुटुंबाची सुरक्षा देखील कमी केली. पायलट व्हॅन देखील कमी केल्या. काँग्रेसचे सरकार असले तरीही त्यांनी 'मातोश्री'ला सुरक्षा देण्याचे काम केले होते. शिंदे यांनी ठाण्यात छोट्या छोट्या कार्यकर्त्याला सुरक्षा दिली आहे. मात्र, 'मातोश्री'ची सुरक्षा कमी केली. सुरक्षा कमी केली असली तरी त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही आहोत, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.