Sharad Pawar Retirement: शरद पवार यांच्या पदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर...

Jitendra Awhad On Sharad Pawar Retirement: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठी घोषणा करत आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, अशीही घोषणा त्यांनी केली.

त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना हा निर्णय मागे घेण्याचे साकडे घातले.

Sharad Pawar
Sharad Pawar Retirement : तुम्ही आमचे नेते, तुम्हीच आमची कमिटी; भुजबळांची पवारांना निर्णय मागे घेण्याची गळ

तसेच यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. तसेच यावेळी जेष्ठ कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना अश्रू अनावर झाले. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी साकडे घातले आहे. शरद पवार हा निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत सभागृह न सोडण्याची कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar Retirement: शरद पवार यांच्या पदावरुन पायउतार होण्याच्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर...

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी तुम्हीच आमचे नेते, अध्यक्षपदावरून निवृत्त होऊ नका, अशी विंनती करत हा निर्णय मागे घेण्याची भावनिक साद त्यांनी यावेळी घातली. तसेच यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com