Leaders Of Opposition Meeting : देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची पुढची बैठक 'या' शहरात होणार

गेल्या दोन दिवसांपासून बंगळुरूमधील विरोधकांच्या बैठकीला तब्बल २६ पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे ती संख्या पाटण्यापेक्षा अधिक आहे.
Leaders Of Opposition Meeting
Leaders Of Opposition MeetingSarkarnama
Published on
Updated on

Bangalore News : देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची गेल्या दोन दिवसांपासून बंगळुरुमध्ये बैठक होत आहे. त्या बैठकीत विरोधी पक्षाच्या आघाडीला इंडिया हे नाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, विरोधी पक्षाच्या नेत्यांची पुढची बैठक ही मुंबईत होणार आहे, अशी घोषणा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली आहे. (Next meeting of the India Alliance will be held in Mumbai)

भाजप (BJP) सरकारच्या विरोधात देशातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी, जदयू, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट यांच्यासह तब्बल २६ पक्ष एकत्र आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बंगळुरूमधील (Bengalore) विरोधकांच्या बैठकीला तब्बल २६ पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे ती संख्या पाटण्यापेक्षा अधिक आहे.

Leaders Of Opposition Meeting
Kirit Somaiya viral video : सोमय्या यांच्या अडचणीत वाढ; दानवेंचा पेन ड्राईव्ह आणि फडणवीसांची घोषणा...

दरम्यान, विरोधकांच्या आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मांडला. त्यास सर्व पक्षाच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. विरोधकांची ही आघाडी आगामी लोकसभा निवडणूक इंडिया नावाखाली लढवणार आहे. या आघाडीची ‘UNITED WE STAND...' अशी घोषणा असणार आहे.

Leaders Of Opposition Meeting
Opposition Meeting News: विरोधकांची रणनीती ठरली? बंगळुरूमधील बैठकीत पंतप्रधानपदाबाबत खर्गेंचं मोठं विधान

विरोधकांच्या आघाडीच्या बैठकीच्या नियोजनासाठी ११ सदस्यांची समिती नेमण्यात येईल. त्यात एक सचिव कॅम्पेन मॅनेजमेंटसंदर्भात काम करतील, असेही खर्गे यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्ष एकत्र आल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आता त्यांच्या आघाडीतील पक्षाचे तुकडे तुकडे जोडत आहेत, असा टोमणाही आजच्या एनडीएच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर खर्गे यांनी भाजपला लगावला.

Leaders Of Opposition Meeting
Bacchu Kadu News : मुख्यमंत्र्यांची अडचण पाहून मंत्रिपदावरील दावा सोडला; पण या आमदाराला मंत्री करा, बच्चू कडूंची नवी मागणी

दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांची पहिली बैठक ही बिहारची राजधानी पाटणा येथे २३ जून रोजी झाली होती. त्यात बैठकीला देशभरातील सुमारे १६ पक्षाचे प्रमुख उपस्थित होते. त्याच वेळी पुढची बैठक सिमल्यात घेण्याचे ठरले होते. मात्र, सिमल्यात अतिवृष्टी होत असल्याने बंगळुरूमध्ये बैठक घेण्याचे ठरले होते, त्यानुसार १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरूमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com