BJP-Shivsena alliance : भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला ठरला; महामंडळे-मंत्रिपदांचे 'असे' असेल वाटप !

BJP-Shiv Sena alliance Ministerships distributed Equally : सिध्दीविनायक मंदिर शिवसेना शिंदेगटाला तर शिर्डी देवस्थान भाजपकडे अशी विभागणी होणार आहे.
Eknath Shinde - Devendra Fadnavis
Eknath Shinde - Devendra FadnavisSarkarnama

Mumbai News : २७ वर्षपूर्तीला केवळ काही दिवस शिल्लक असताना भारतीय जनता पक्ष (BJP News)आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने महामंडळाचे समसमान वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दोन्ही पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये सुसंवादाबद्दल चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल महत्वाची चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान झाली असून लवकरच शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Eknath Shinde - Devendra Fadnavis
Ramdas Athawale on Pankaja Munde : पंकजा मुंडे बीआएस मध्ये जाणार ? आठवले म्हणतात, 'त्या नाराज..'

महामंडळे हा सत्तावाटपात नेहमीच महत्वाचा मुद्दा ठरला असून, सर्व महत्वाची महामंडळे समसमान वाटली जाणार आहेत. सिध्दीविनायक मंदिर शिवसेना शिंदेगटाला तर शिर्डी देवस्थान भाजपकडे अशी विभागणी होणार आहे. सिडको महामंडळ भाजपकडे तर म्हाडा शिवसेना शिंदेगटाकडे, विदर्भ वैधानिक विकास मंडळ भाजपकडे तर पश्चिम महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्षपद यापूर्वीच शिंदेगटाकडे सोपवण्यात आले आहे.

महामंडळांची सदस्यसंख्या एकत्रित करुन त्याचेही योग्यतेनुसार वाटप करण्याचे ठरले आहे, असे समजते. शिंदे गटाच्या खरे तर एकत्रित रित्या शिवसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांची संख्या भारतीय जनता पक्षापेक्षा कमी असली तरी महामंडळातील सत्तावाटपात कोणताही किंतू - परंतु न आणता योग्य न्याय देण्याचे सूत्र भाजपने मान्य केले आहे.

Eknath Shinde - Devendra Fadnavis
Madhya Pradesh Survey : मध्य प्रदेशात काँग्रेस की भाजपा? सर्व्हेतून मोठी आकडेवारी समोर

आपल्यासमवेत आलेल्या मंडळींना न्याय देण्याचे धोरण मोठा भाऊ या नात्याने भाजपने अंमलात आणले आहे, असे शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याने नमूद केले. लोकसभेच्या जागावाटपात अन् मंत्रिमंडळाच्या जागावाटपातही असेच समसमान सूत्र अंमलात आणले जाईल काय ? भाजप याबाबतही औदार्य दाखवणार का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात केला जातो आहे. शिंदे फडणवीस यांच्या लोकप्रियतेची तुलना करणारी जाहिरात तसेच अन्य काही तणाव विषयांवर या वेळी सविस्तर चर्चा झाली असे समजते.

परस्परांशी आदरपूर्वक वर्तणूक केली तर निवडणुकीला सामोरे जाणे अधिक योग्य ठरेल असा मुद्दा काही ज्येष्ठ नेत्यांनी मांडला अन तो अंमलात आणला तरच महाविकास आघाडीला आपण सामोरे जावू शकू, असेही नमूद करण्यात आले. युतीधर्माचे पालन करण्याच्या आणाभाका घेत दोन्ही पक्षांनी परस्परांकडे असलेल्या खात्यांबद्दल काही समस्या असतील, सूचना असतील तर त्या कुठे मांडाव्यात याबद्दलही समन्वय राखणारी यंत्रणा उभारली जाणार आहे.सरकारची धोरणे एकत्रितपणे मांडण्याचेही ठरवण्यात आले आहे .

Eknath Shinde - Devendra Fadnavis
Gopichand Padalkar On Love Jihad : कोल्हापुर-नगर 'लव्ह जिहाद' प्रकरणी पोलिसांनी योग्य कलमं लावली नाही; आरोपी मोकाट फिरतात; पडळकरांचा आरोप!

मित्रपक्षांची बैठक -

आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या सर्व मित्रपक्षांची बैठक घेतली. सर्व निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला . (Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com