Onion Farmers News: राज्यातील कांदा उत्पादकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. कांदा उत्पादकांना ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यातच अतिवृष्टीमुळेही शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पण कांदा उत्पादकांना यामुळे दिलासा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
दरात घसरण सध्या राज्यातील कांदा (onion) उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली केली. देशाच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा 43 टक्के हिस्सा आहे. मात्र इतर राज्यात कांद्याच उत्पादन वाढल्याने कांद्याच्या दर घसरले आहेत.
कांदा हे महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील विषय आहे. पण देशातील इतर राज्यामध्येही कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येणार नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
याशिवाय देशातील कांदा उत्पादन आणि कांद्याची देशांतर्गत मागणी व निर्यात या सर्वांचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होत असतो. पण उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. या समितीने दोनशे आणि तीनशे रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची शिफारस केली होती.
त्यानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल 300 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांना सांगितले. आतापर्यंतची ही सर्वात जास्त मदत आहे. ही फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्ष देण्याचा निर्णय आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.