Sharad Pawar on Mumbai: मुंबई केंद्रशासित होण्याचा चर्चेला आता पूर्णविराम द्यायला हवा; शरद पवारांनी पुस्तकात मांडली भूमिका

MVA and Mumbai : आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भूमिकेडे लक्ष
Sharad PAwar
Sharad PAwarSarkarnama

Sharad Pawar on Mumbai : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सरकार जाऊन राज्यात शिंद-फडणवीस सरकार आले. दरम्यान भाजपने मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून केला जात आहे. मात्र, मुंबई केंद्रशासित करण्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात मांडली आहे.

Sharad PAwar
Sharad Pawar Resigns As NCP Chief : सुप्रिया सुळेंच्या भविष्यवाणीतला पहिला भूकंप आज झाला, दुसरा कधी होणार?

शरद पवारांचे आत्मचिरित्र 'लोक माझे सांगाती' भाग दोनचे मंगळवारी (ता. २) प्रकाशन करण्यात आले. त्या पुस्तकाच्या माध्यमातून पवार यांनी मुंबई (Mumbai) केंद्रशासित प्रदेश करण्याच्या चर्चेला पूर्णविराम द्यायला हवा, अशी भूमिका पवारांनी मांडली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यावरून आगामी काळात काय भूमिका घेणार हे पहावे लागेल.

Sharad PAwar
Sharad Pawar News : पवारांनी राजीनामा तर दिला; पुढे काय? 'यांना' मिळू शकते संधी...
Sharad Pawar's Book
Sharad Pawar's BookSarkarnama

सध्या राज्यात ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या (MVA) वज्रमूठ सभा होत आहेत. त्या सभांच्या माध्यमातून भाजपचा मुंबईवर डोळा असल्याचा आरोप करतात. मुंबई महापालिकेच्या मुदतठेवींवर भाजपचे लक्ष आहे. त्यामुळे त्यांना मुंबई महानगरपालिकेवर (BMC) सत्ता हवी आहे. दरम्यान, मुंबईत सोमवारी (ता. १) वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत सर्व नेत्यांनी हाच मुद्दा उचलून धरला होता. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे आम्ही तुकडे करू असा इशाराही दिला आहे.

Sharad PAwar
Sharad Pawar resigns as NCP chief : साहेब निर्णय मागे घ्यावा; शरद पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे साताऱ्यात आंदोलन

मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याच्या प्रयत्नांचे पुरावे असल्याचा दावाही राऊत यांनी केलेला होता. या कटात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, पक्षाचे नेते, बिल्डर, व्यापारी यांचा एक गटाचा सहभाग आहे. योजना तयार करून केंद्रीय गृहमंत्रालयाला ती सादर करण्यात आल्याचाही दावा राऊत यांनी केला होता.

Sharad PAwar
Sharad Pawar Resigns : 'पवारसाहेब तुम्ही अध्यक्ष पदावर हवे आहात'; नारायण राणेंची साद !

दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांनी त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याची भूमिका मांडली आहे. पवारांच्या या भूमिकेनंतर यापुढील काळात महाविकास आघाडीतील नेते काय भूमिका घेणार, हे पहावे लागणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com