Sharad Pawar Resigns : 'पवारसाहेब तुम्ही अध्यक्ष पदावर हवे आहात'; नारायण राणेंची साद !

Narayan Rane On Sharad Pawar Resigns : नारायण राणेेंची भावनिक साद..
Narayan Rane On Sharad Pawar Resigns :
Narayan Rane On Sharad Pawar Resigns : Sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Resigns Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून पायउतार होणार, असे जाहीर केले आणि राज्यभरात पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सत्र सुरू झाले आहे.पवारांच्या या निर्णयानंतर धाराशिव, बुलढाण्याच्या शहराध्यक्ष यांनी राजीनामा देणार असे जाहीर केले होते. पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विरोध सुरू आहे. आता पुणे शहरातसुद्धा राजीनामा सत्र सुरू झाले आहे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत असल्याचे सांगितले आहे. (Latest Marathi News)

Narayan Rane On Sharad Pawar Resigns :
Purandar News : पुरंदरचे माजी आमदार सध्या बारामतीत काही वल्गना करत आहेत, त्यांनी आधी स्वतःचे पहावे : राष्ट्रवादीचा शिवतारेंना टोला

शरद पवार यांच्या या निर्णयानंतर अनेक राजकीय क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांनी ट्वीट करत या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. नारायण राणे म्हणाले, "माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आण‍ि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या अध्‍यक्षपदी सुध्‍दा हवेत."

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज अचानक पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय देशासाठी दुर्दैवी असून प्रत्येक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणारा आहे. त्यामुळे शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी भूमिका बहुतांश राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भूमिका घेतली. हा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी शरद पवारांची विनवणी करण्यात येत आहे.

Narayan Rane On Sharad Pawar Resigns :
Ajit Pawar News : राजीनामा सत्र थांबवा, कुणाचेही मंजूर होणार नाहीत; अजित पवारांनी केले स्पष्ट !

दरम्यान, "पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालो असलो तरी, सार्वजनिक कार्यातून कुठेही दूर जाणार नाही. सात दशकांहून अधिक काळ जनमानसांत काम करत आलोय आणि त्या सेवेत कोणताही खंड पडणार नाही. सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी कुठेही असेन, तिथे तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे उपलब्ध असेन," असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com