मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मला धमकीचं पत्र आलं आहे. पत्रात ऊर्दु शब्दांचा उल्लेख असून राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या संदंर्भात मी नुकतीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच, आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने राज ठाकरे यांच्या सुरक्षेबाबत दखल घ्यावी अशी विनंती बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मलाही धमकीचं पत्र आलं आहे. यात मला आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. राज यांनी भोंग्यांविरोधात सुरु केलंलं आंदोलन थांबवण्याची धमकी या पत्रातून दिली आहे. तसेच,अजानाविरोधातील भूमिकेचाही पत्रात उल्लेख केला आहे. धमकीचे पत्र आल्यामुळे मी आज गृहमंत्र्यांची आणि पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचे यावेळी नांदगावकर यांनी सांगितले. पण राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल, असा इशाराही बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.
दरम्यान, हनुमान चालिसा आंदोलनामळे राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरु आहे. अनेकांना १४९ कलमांतर्गत प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. याशिवाय मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) आणि स्वतः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
मनसे विरोधातील याच कारवाईनंतर आता मनसे नेते बाळा नांदगावकर मैदानात उतरले आहेत. बाळा नांदगावकर यांनी आज गृहमंत्री बाळा नांदगावकर यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे २० मिनीट चर्चा झाली. त्यानंतर नांदगावकर शिवतीर्थ इथे राज ठाकरे यांच्याभेटीसाठी गेले. त्यांनी काल मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे आणि पोलिस सह आयुक्त (गुन्हे) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. मनसे विरोधातील कारवाईची धार कमी करण्याबाबत या भेटीत चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.