UBT Vote Share in BMC: मुंबईत ठाकरे सेनेच्या मतांची टक्केवारी वाढली; कुठल्या भागातला मतदार राहिला ठाकरेंसोबत?

UBT Vote Share in BMC: मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल आता जाहीर झाले आहेत. यामध्ये ८९ जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या स्थानी ठाकरेंची शिवसेना ६५ जागांवर आहे.
UBT Vote Share in BMC
UBT Vote Share in BMC
Published on
Updated on

UBT Vote Share in BMC: मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल आता जाहीर झाले आहेत. यामध्ये ८९ जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या स्थानी ठाकरेंची शिवसेना ६५ जागांवर आहे. या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पण यामध्ये शिवसेना फुटीनंतर आणि विधानसभेला मोठा फटका बसल्यानंतरही ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील गेल्यावेळच्या तुलनेत मतांची टक्केवारी वाढली आहे. तसंच कुठल्या भागातल्या मतदारांनी ठाकरेंना साथ दिली जाणून घेऊयात.

UBT Vote Share in BMC
Marathwada Mahapalika: विरोधकांनी एकीनं मारलं परभणी, लातूरचं मैदान! बिघाडीनं संभाजीनगर, जालना अन् नांदेडमध्ये सुपडासाफ

मुंबई महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत ६४ लाख ५४ हजार ४१२ इतकं ईव्हीएमवर मतदान झालं. तर ११ हजार ६७७ हे टपाली मतदान झालं. यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला २ लाख ७३ हजार ३२६ मत मिळाली. त्यामुळं एकूण मतांच्या तुलनेत त्यांना ५ टक्के मतं मिळाली आहेत. तर ठाकरेंच्या सेनेला ७ लाख १७ हजार ७३६ इतकी मतं मिळाली, म्हणजेच एकूण मतांच्या तुलनेत ही मतं १३.१३ टक्के इतकी आहेत. तर मनसेला यंदाच्या निवडणुकीत ७४ हजार ९४६ इतकी मतं मिळाली जी एकूण मतांपैकी १.३७ टक्के इतकी आहेत.

UBT Vote Share in BMC
Maharashtra Dynastic Politics: घराणेशाहीला जनतेनं नाकारलं, कार्यकर्त्यांना दिलं बळ! नेते मंडळीच्या कुटुंबातील 'या' उमेदवारांचा झाला पराभव

दरम्यान, गेल्यावेळी पक्ष एकसंध असताना शिवसेनेनं २२७ जागांवर निवडणूक लढवली होती. यामध्ये ८४ उमेदवार निवडून आले होते. तर भाजपनं देखील २२७ जागा लढवल्या होत्या यामध्ये त्यांना ८२ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी ही टफ फाईट झाली होती, भाजप केवळ २ जागांनीच मागे होती. त्यावेळी मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. पण निकालानंतर यांपैकी ६ नगरसेवक शिवसेनेसोबत गेले होते. पण गेल्यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेनं २२७ जागा जिंकल्या होत्या त्यावेळी मिळालेल्या मतांची टक्केवारी ३८ टक्के होती. पण यंदा १३४ जागा लढवून ६५ जागा जिंकल्या आणि ७ लाख १७ हजार ७३६ इतकी मतं ठाकरेंनी मिळवली. यातून त्यांची मतांची टक्केवारी ३९ टक्के इतकी आहे. त्यामुळं गेल्यावेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत एक टक्क्यानं वाढ झाली आहे.

UBT Vote Share in BMC
KDMC Election: निवडणूक बंदोबस्तावरील पोलिसाचा संताप! मंजूर केला केवळ 500 रुपये भत्ता; उचललं स्वाभिमानी पाऊल

यंदा मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या सुरक्षेसाठीचा मुद्दा ठाकरे बंधुंनी (उद्धव ठाकरे-राज ठाकरे) पेटवला होता. त्यामुळं सहाजिक मराठीबहुल भागातून ठाकरेंना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. यामध्ये कुलाब्यापासून महीम ते वरळीपासून वडाळ्यापर्यंत जो काही भाग येतो तो मराठी बहुल भाग असल्यानं इथूनच ठाकरेंना सर्वाधिक मतदान झालं असून नगरसेवकही निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com