Shinde Vs Thackeray : वज्रमूठ सभेआधीच शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का; पक्षाची खडा न् खडा माहिती असलेला मोहरा गळाला...

Political News: ...म्हणून शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा
Shinde Vs Thackeray
Shinde Vs Thackeray Sarkarnama

Mumbai : ठाकरे गटाचे खासदार व नेते अनिल देसाई यांचे निकटवर्तीय आणि पक्षाची खडा न् खडा माहिती असलेले मारुती साळुंखे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. वर्षा निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. मुंबईतील वज्रमूठ सभेआधीच शिंदेनी ठाकरे गटाला हा मोठा धक्का दिला आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray)नी पक्षाची पुनर्बांधणीदरम्यान मारुती साळुंखे यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यांना अनेक वर्षापासून शिवसेनेतील कामाचा अनुभव असलेला मोहरा शिंदे यांना मिळाल्यानं निश्चितच आगामी काळात पक्षवाढीसाठी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. साळुंखे यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे हे देखील उपस्थित होते.

Shinde Vs Thackeray
Aatpadi Bazar Samiti: आटपाडी बाजार समितीत मोठा ट्विस्ट; पडळकरांनी राष्ट्रवादीची हातमिळवणी केली, पण...

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज(दि.१) बीकेसी मैदानावर होत आहे. मारुती साळुंखे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी त्यांना ओळखलं जात होतं. गटातील आणि संघटनेची घडी कशी बसवावी तसेच प्रत्येकाशी संपर्क ठेवून संघटना तळागाळात कशी पोहचवावी याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. तेच आता शिंदे गटात आल्याने शिंदे गटाला मोठं बळ मिळालं आहे.

गेल्या काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी सलगी करून घेतलेली भूमिका त्यांना पटेनाशी झाली होती. तसेच बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जायचे असेल तर एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालील शिवसेनेत जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही हे पटल्यानेच त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

Shinde Vs Thackeray
Mouda APMC Election Result : काँग्रेसच्या एकीमुळे मौदा बाजार समितीवरही कब्जा, केदारांची जादू चालली !

शक्तिप्रदर्शन करण्याचा आघाडीचा प्रयत्न

महाविकास आघाडी पुन्हा एकदा राज्य तसेच केंद्र सरकारविरोधात उभी ठाकली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील सभेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आघाडीची वज्रमूठ सभा सोमवारी(दि.१) मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानावर होत आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या निमित्ताने राजधानी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा आघाडीचा विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा तसेच काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com