Aatpadi Bazar Samiti: पवारांवर कायम तुटून पडणाऱ्या पडळकरांची आटपाडीत राष्ट्रवादीशी युती...

Sangali news| आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकही चांगलीच चर्चेत राहिली
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Aatpadi Bazar samiti Result : राज्यभरात कृषी उत्त्पन्न बाजार समित्यांच्या निकालाची रणधुमाळी सुरु आहे.आतापर्यंत या निवडणुका आणि निकालामध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. यात आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकही चांगलीच चर्चेत राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर विरोधक मानले जाणारे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी हातमिळवणी केल्याने आटपाडी बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. (Padalkars, who have always criticized Pawar, have an alliance with NCP)

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी हातमिळवणी करत पॅनेल उभं केलं.त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसच्या पॅनेलचं आव्हान होतं. पण निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.आटपाडी बाजार समितीच्या निकालात दोन्ही आघाड्यांना १८ पैकी नऊ-नऊ अशा सम-समान जागा मिळाल्या. यात कोणालाही कोणालाही बहुमत न मिळाल्याने सत्तेचा तिढा निर्माण झाला आहे. (Sangali Bazar samiti)

Gopichand Padalkar
Dhamangaon APMC Election Result : धामणगावात माजी आमदारांनी विद्यमान आमदारांना चारली धूळ !

आटपाडीच्या बाजार समितीत १८ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. तसेच निवडणुकीत ९३ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. गोपीचंद पडळकरांनी माजी आमदार राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादीचे नेते हणमंतराव देशमुख यांचे पॅनेल तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुकीत १८ पैकी दोन्ही आघाड्यांना ९-९ अशा जागा मिळाल्या. निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अशा परिस्थितीत आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमकी सत्ता कोणाची येणार, अशा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com