Mumbai News : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तसेच त्यांना भाजपची सत्ता असलेल्या मुंबै जिल्हा बँकेच्या संचालकपदीही त्यांची वर्णी लागल्यामुळे त्यांच्या शिवसेनेतील नाराजी आणि उद्धव ठाकरेंनीही तेजस्वी घोसाळकरांना (Tejasvee Ghosalkar) मोठी जबाबदारी दिली आहे.
मुंबई बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मातोश्री जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्याकडे तेजस्वी घोसाळकर यांची ठाकरेंनी त्यांच्याकडे शिवसेनेच्या दहिसर विधानसभा प्रमुखपदाची सोपवली आहे. घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
दहिसर मतदारसंघातील स्थानिक पदाधिकार्यांकडून मिळत असलेल्या वागणुकीवर तेजस्वी घोसाळकर यांनी आपली उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. तसेच वारंवार मातोश्रीवर याबाबत तक्रार पोहचूनही आपली दखल घेतली गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.
यानंतर मात्र, त्यांनी राजीनाम्याचं शस्त्र उपसल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत अस्वस्थता पसरली होती. तसेच त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांनीही जोर धरला होता. याचवेळी त्यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर या चर्चांना आणखीच बळ मिळालं. पण याचवेळी त्यांचे सासरे आणि शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट आपण आपली सून तेजस्वी घोसाळकर मातोश्री सोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं.
आता तेजस्वी घोसाळकर यांनी मी पक्षात नाराज होते, पण आता उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर त्यांनी माझी नाराजी दूर केली आहे. त्यामुळे आपण अजूनही त्यांच्यासोबतच आहोत. ते माझे कुटुंबप्रमुख असल्याची भावनाही घोसाळकर यांनी व्यक्त केली होती.
माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या महिला नेत्या तेजस्वी घोसाळकरांचे दिवंगत पती,मुंबई बँकेचे संचालक राहिलेल्या अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. तसेच अभिषेक यांच्या रिक्त जागेवरच तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना सुरू झाल्या होत्या.
तेजस्वी यांची संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, एका वर्षापूर्वीच मी व माझे सासरे विनोद घोसाळकर आम्ही दरेकर साहेबांना भेटून याबाबत विनंती केली होती.
तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये प्रवीण दरेकर यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, माझे पती अभिषेक घोसाळकर यांच्या रिक्त असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदावर माझी एकमताने निवड केल्याबद्दल मी बॅंकेचे अध्यक्ष प्रविणभाऊ दरेकर तसेच सर्व संचालक मंडळाचे मनापासून आभार मानते.हा माझा सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा व पहिलाच अध्याय आहे, मात्र माझ्या परिवाराने आजवर केलेल्या कामाचा अनुभव व अभिषेक यांच्या जवळ राहून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून मी चांगले काम करेल याची खात्री देते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.