Chitra Wagh : ठाण्यातील चित्रा वाघ यांच्या एंट्रीने अनेकांची डोकेदुखी वाढली; अ‍ॅक्शन मोडवर आल्याने राजकीय फटाके फुटणार !

Thane political News : कळवा रुग्णालयातील आकडेवारीबद्दल माहिती घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे ठाण्यात अनेकांचे टेन्शन वाढले असून त्यांची ही एन्ट्री हे अनेकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
chitra wagh
Chitra WaghSarkarnama
Published on
Updated on

Thane news : राज्यात आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी निवडणुकीच्या तोंडावरच ठाण्यात एंट्री केली आहे. त्यांनी कळवा रुग्णालयातील आकडेवारीबद्दल माहिती घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे ठाण्यात अनेकांचे टेन्शन वाढले असून त्यांची ही एन्ट्री हे अनेकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

आमदार चित्रा वाघ यांनी सोमवारी दुपारी कळवा रूग्णालयाला भेट दिली. यावेळी ठाणे पालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. यावेळी रुग्णालयातील आकडेवारीबद्दल चित्रा वाघ यांनी माहिती घेतली. चित्रा वाघ येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. प्रसूती कक्षासमोरील बेड उपलब्ध नसल्याच्या बोर्ड काढून टाकण्यात आला. बोर्डची साफ सफाई करून नवीन बोर्ड लावण्यात आला.

chitra wagh
Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात मोठा धक्का, महत्वाचा बडा नेता लागला भाजपच्या गळाला

2023 मध्ये मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना सुरू केली होती. गरीब, गरजू आणि अति दुर्बल घटकांना मोफत प्राथमिक उपचार मिळावेत, हा उद्देश होता. 30 प्रकारच्या चाचण्या, 105 औषधे, 66 उपकरणे आणि तब्बल 210 कोटींचा निधी या योजनेला देण्यात आला होता. याअंतर्गत ठाण्यात सुमारे 50 ठिकाणी केंद्रं उभारली गेली. पण आता त्या दवाखान्यांपैकी अनेक ठिकाणी दरवाजे बंद आणि बॅनर धुळ खात पडलेले दिसत आहेत.

chitra wagh
BJP Office: भाजपच्या नुतन प्रदेश मुख्यालयाच्या जागेवरुन वाद! BMCचा निवासी भूखंड 11 दिवसांत हस्तांतरीत; नेमकं प्रकरण काय?

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय गरोदर महिलांना उपचारासाठी त्रास होत असल्याची बातमी समजली. त्यामुळे या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि महिलांना होणारा त्रास साठी टीएमसी कमिशनर आणि हॉस्पिटलचे अधिकारी त्यांच्याशी विचारपूस केलेला आहे. तिथे 25 गरोदर महिलांसाठी सुविधा आहे आणि गरोदर महिलांची संख्या जास्त आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी-भाईंदर येथून महिला येथे येतात. त्यामुळे हॉस्पिटलवर ताण आहे. बेडची संख्या वाढणार आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

chitra wagh
Uddhav Thackeray Politics: भाजपचा असाही गेम प्लॅन; पूर्वाश्रमीचे शिवसेना नेत्यांचे परस्परांवरच हल्ले!

ठाण्यातील अनेक नेत्यांची डोकेदुखी वाढणार

ठाण्यातील चित्रा वाघ यांची एन्ट्री हे अनेकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली नाही तर दोन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याची घोषणा करू शकतात. त्यामुळे चित्रा वाघ यांची आजची भेट ही शिवसेनेसाठीही डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

chitra wagh
BJP Politics : 'जेवढ्या वेगाने वर गेलो तेवढ्याच वेगाने खाली आपटू, भाजपमधील इन्कमिंगवर गडकरींची नाराजी'; बावनकुळे म्हणाले, आम्हाला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com