घर झाल्यावर आम्हाला चहाला बोलवा : चाळ रहिवाशांना मुख्यमंत्र्यांची भावनिक साद

Uddhav Thackeray : मुंबईतील घर न विकण्याचे चाळकऱ्यांना आवाहन
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गोरेगावमधील पत्राचाळ (सिद्धार्थनगर) येथे नवीन इमारत बांधण्यासाठीच्या कामाचा प्रारंभ आज मोठ्या दिमाखात आज करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील असे मान्यवर या वेळी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. या वेळी बोलताना ठाकरे म्हणाले की पत्राचाळ हा विषय अनेकांना माहीत आहे. त्याचे दळण अनेक वर्षे दळल जात होते. पत्रा चाळीत काही महिन्यांपूर्वी संघर्ष समिती भेटायला आली होती. तेव्हा आम्ही त्यांना वचन दिले होतं. हा विषय सोडवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांना दिला होता. सगळ्या अडचणी दूर करून हा मुहूर्त आज साधला जात आहे.

Uddhav Thackeray
महापालिका निवडणुकीतही भाजप धरणार हिंदुत्वाची कास!

सुभाष देसाईंनी यासाठी पिच्छा पुरवला होता. प्रत्येक भेटीत सतत त्यांचा तोच विषय असायचा. अडचणीतून मार्ग काढण्याचा ठऱविले तर तो निघतो. या प्रकल्पासाठी किती अडचणी आल्या, हे आता बोलणार नाही. पण चिकाटी असली की सगळं काही मार्ग लागते. आज भूमिपूजन होत असले तरी काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास आहे. घर मिळवायला तुम्ही केलेला संघर्ष लक्षात ठेवा. जुन्या लोकांची आठवण ठेवा. घर मिळाल्यावर हे घर विकून निघून जाऊ नका. तुमचा संघर्ष तुम्ही लक्षात ठेवा.मुंबईत पोटासाठी आपण येतो. असे हक्कच घर मिळाल की ते विकून न जाता ते राखा. घर झाल्यानंतर आम्हाला चहाला बोलवा , एवढी अपेक्षा, अशा शब्दांत ठाकरे यांनी चाळवासियांना शुभेच्छा दिल्या.

Uddhav Thackeray
डिसले गुरूजींची जागतिक बॅंकेच्या सल्लागार पदी नियुक्ती खोटी? : नेमके सत्य काय?

सतेज पाटील म्हणाले की सुभाष देसाईंच्या पुढाकाराने जितेंद्र आव्हाडांनी प्रयत्न करून हा प्रकल्प पूर्ण करण्याची भूमिका घेतली. मुंबईत घर असावे, असे आपल्याला कायम वाटत असते. पत्रा चाळीतील लोकांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून ही घरे उभी राहत आहेत. मुंबईला महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकास करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. SRA MHADA च्या माध्यमातून आपण लाखो घरे देण्याचा मुंबईकरांना प्रयत्न करत आहोत. इतिहासातील नवीन पान म्हणून पत्रा चाळ ओळखली जाईल. इतरही राहिलेली कामं पूर्ण केली जातील, याची ग्वाही महाविकासआघाडी कडून देतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com