Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश; दोन्ही नेते एकत्रित असतानाचं 'ते' VIDEO प्रकरण पुन्हा चर्चेत

Uddhav Thackeray Summons : २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे अशी लढत झाली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी आनंद परांजपे यांच्यासाठी घेतलेल्या एका प्रचार सभेत वसंत डावखरेंचा एक व्हिडिओ दाखवला होता.
eknath shinde uddhav thackeray
eknath shinde uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 30 Jul : शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने समन्स पाठवल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण कोर्टाने येत्या ५ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश या समन्समधून दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवल्या प्रकरणी हे समन्स पाठवलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी वसंत डावखरे विरुद्ध आनंद परांजपे अशी लढत झाली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी आनंद परांजपे यांच्यासाठी घेतलेल्या एका प्रचार सभेत वसंत डावखरेंचा एक व्हिडिओ दाखवला होता. ज्यामध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती बाळगू नका असं आवाहन करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

तर हा व्हिडिओ दाखवल्या प्रकरणी वसंत डावखरे यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद पराजंपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर खटला दाखल केला होता. डावखरेंनी व्हिडिओतील वक्तव्य आपण केलं नसल्याचं सांगत हा व्हिडिओ एडिट करून बदनामीसाठी वापरल्याचा दावा केला होता.

eknath shinde uddhav thackeray
Pune police : तपासाच्या नावाखाली पोलिसांची मौजमजा! महिलेला ढाब्यावर नेलं, कास पठारावर फिरवलं! पण ज्या कामासाठी गेले ते न करताच परतले...

मात्र, शिवसेनेने हा व्हिडिओ डावखरेंचाच असल्याचा दावा करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. आता हेच प्रकरण कोर्टात गेलं असून या प्रकरणी कल्याण कोर्टाने ठाकरेंना समन्स पाठवलं आहे.

eknath shinde uddhav thackeray
Abhijeet Dipke : धर्मेंद्र प्रधाना यांच्यानंतर अभिजीत दीपकेंनी अमित शहांकडे मोर्चा वळवला; थेट राजीनाम्याची मागणी करत म्हणाले, "तुम्ही फेल..."

त्यामुळे ठाकरे ५ तारखेला कोर्टात हजर राहणार की वकिलामार्फत आपली बाजू मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, याच प्रकरणी आता एकनाथ शिंदेंना देखील ६ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com