Ladki Bahin Yojana : ठाकरेंच्या विश्वासू नेत्यानं वाढवली 'लाडक्या बहिणीं'ची धाकधूक; म्हणाले, ...तोपर्यंतच योजना सुरू राहणार!

Shivsena Leader Vinayak Raut Comment On CM Ladki Bahin Yojana : एकीकडे नवीन वर्ष सुरू होण्याआधीच लाडक्या बहि‍णींना सरकारकडून आनंदाची बातमी दिली आहे.पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार आणि कोकणातील ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी लाडकी बहीण योजनेविषयी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
Ladki bahin yOJANA .jpg
Ladki bahin yOJANA .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची दाणादाण उडवत महायुती सरकारच्या पारड्यात अभूतपूर्व यश टाकण्यात लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे. पण या योजनेबद्दल सातत्याने शंका उपस्थित केली जात आहे. विरोधकांकडून ही योजना फार काळ चालणार नसल्याचे दावे केले जात आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढेही लाडकी बहीण (CM Ladki Bahin Yojana) ही योजना सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच महिलांच्या खात्यात सहावा हप्ता देखील जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पण आता पुन्हा लाडक्या बहि‍णींची धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे.

एकीकडे नवीन वर्ष सुरू होण्याआधीच लाडक्या बहि‍णींना सरकारकडून आनंदाची बातमी दिली आहे.पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार आणि कोकणातील ज्येष्ठ नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लाडकी बहीण योजनेविषयी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना वेतन देतानाच राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे.त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही फार काळ चालणार नाही असं वक्तव्य राऊत यांनी केले आहे. आधीच सरकारकडून लाडक्या बहिणींकडून पात्रतेचे निकष कठोर करण्यात येणार असून त्यातून मोठ्या प्रमाणात महिलांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यातच आता राऊतांच्या दाव्यानं महिला वर्गाचं टेन्शन वाढवलं आहे.

Ladki bahin yOJANA .jpg
Walmik Karad : संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड पुढच्या काही तासांत सरेंडर करणार..?

विनायक राऊत नेमकं काय म्हणाले..?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी महायुती सरकार आणि त्यातच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ते म्हणाले, सध्या महाराष्ट्र कर्जात बुडाला आहे,त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था सांभाळण्याचं मोठं आव्हान अजितदादा पवार कसं पेलणार हा प्रश्नच आहे.आगामी काळात होत असलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजना ही सुरू ठेवण्यात येईल. मात्र,त्यानंतर ही योजना बंद महायुती सरकारकडून बंद पाडण्यात येईल असं खळबळजनक विधान माजी खासदार राऊतांनी केलं आहे.

Ladki bahin yOJANA .jpg
National Politics in 2024 : मोदींची हॅट्ट्रिक, केजरीवाल-सोरेन यांना अटक अन् नितीश कुमारांची पलटी; ‘या’ घडामोडींनी गाजले सरते वर्ष

विनायक राऊत म्हणाले,महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळे महाराष्ट्राचा आर्थिक डोलारा सांभाळणे प्रचंड अवघड काम आहे.त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होईपर्यंत ही योजना सुरू राहील.पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर सरकार ‘लाडकी बहीण योजना’ सरकार बंद करेल असेही त्यांनी म्हटलं आहे.

महायुती सरकारकडून एकीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता योजनेतील बहुंताश पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपयांनुसार सहावा हप्ता लवकरच जमा होणार आहे. शिवाय डिसेंबरच्या या हप्त्यासाठी सरकारकडून 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Ladki bahin yOJANA .jpg
Devendra Fadnavis : धसांना धडा शिकवण्यासाठी प्राजक्ता माळी आक्रमक; घेतली थेट फडणवीसांची भेट, 'सीएम'ने दिला 'हा' मोठा शब्द

दरम्यान, याआधी लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यानुसार आतापर्यंत 7500 रुपये लाडक्या बहि‍णींना मिळाले आहेत. तर आता उरलेल्या डिसेंबर महिन्याचा हफ्ता देखील लवकरच खात्यात जमा करण्यात येणार आहे. हा हप्ता देण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com