

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक मातोश्रीवर घेतली होती. या बैठकीची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे. या बैठकीत माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्ती केली. संजय राऊत यांच्यावर संताप व्यक्त करत त्या म्हणाल्या, मला निषेध करायचा आहे. संजय राऊत शरद पवारांबाबत वक्तव्य का करत होते?
राज्यसभा निवडणुकीत शरद पवार हे निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य राऊतांनी केले होते. त्यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी न मिळता महाविकास आघाडीचे उमेदवारी शरद पवारांना मिळाली.
चतुर्वेदी या बैठकीत आक्रमक झाल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्यांनी वक्तव्य केलं तरी पक्षप्रमुख मी आहे. शेवटी निर्णय हे मीच घेईल.
चतुर्वेदी यांच्या नाराजीनंतर ठाकरे यांनी संजय राऊत यांची बाजू घेत. उमेदवारीबाबात आपणच निर्णय घेतल्याचे सांगितले. दरम्यान, बैठकीत खासदारांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्या कार्यकाळाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांनी सहा वर्षात कुठले काम केले, असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.
उद्धव ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीचे लोक सांगतात की तुमचे खासदार फुटणार आहेत. मला तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्या भरवशावर ही लढाई मी लढत आहे. जर तुम्हाला लढायचे नसेल तर सांगा मी थांबतो. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रभर फिरले पाहिजे, अशी मागणी खासदारांनी केली. त्यावर आदित्य ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.