Uddhav Thackeray News : मोठी बातमी! महाविकास आघाडी की स्वबळावर? हॉटेल 'ट्रायडेंट'मधल्या बैठकीत ठाकरेंकडून मोठे संकेत

Mahavikas Aghadi Politics : लोकसभेतील यशानंतर मविआतील तीन तीनही पक्षांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. त्याचमुळे काँग्रेससह आता शिवसेना ठाकरे गटानेही 288 जागांवर चाचपणी सुरू केली आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. दौरे, बैठका, मेळावे यांच्याद्वारे ते चांगलेच अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेला बूस्टरचा ठाकरे आता विधानसभा निवडणुकीत फायदा उचलण्याच्या तयारीत आहेत.

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींकडून विधानसभा निवडणुकीसाठी सातत्याने स्वबळाची भाषा केली जात आहे. त्यात आता शिवसेना ठाकरे गटाने देखील महाविकास आघाडीत असूनही 288 मतदारसंघाची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकी संदर्भातली आढावा बैठक मु्ंबईतील हॉटेल ट्रायडेंटमध्ये मंगळवारी (ता.17) पार पडली.

या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.तसेच उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व अशा 288 जागा लढण्याची तयारी केली असल्याची माहिती पुढे येत आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) या तीनही पक्षांनी एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली होती.या निवडणुकीत तीनही पक्षांना एकत्रित लढण्याचा जबरदस्त फायदा झालेला दिसून आला होता.

48 पैकी तब्बल 31 जागा मिळवत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत महायुतीतील भाजप,शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीनही पक्षांना धोबीपछाड दिली होती.

Uddhav Thackeray News
Narayan Rane : आरक्षणावरुन मराठा-ओबीसी वाद टोकाला; राणेंना झाली थेट शिवाजी महाराजांची आठवण, म्हणाले...

लोकसभेतील यशानंतर मविआतील तीन तीनही पक्षांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. त्याचमुळे काँग्रेससह आता शिवसेना ठाकरे गटानेही 288 जागांवर चाचपणी सुरू केली आहे. तसेच यात शरद पवार गटाने स्वबळाची भाषा केलेली नसली तरी ते विधानसभेला जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे.

कारण शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या.मात्र, महाविकास आघाडीची एकी राहावी यासाठी मी दोन पाऊल मागे आलो.एकत्रित राहिलो म्हणून यश मिळाले. आतापासून विधानसभेच्या कामाला लागा. असं विधान केलं होतं.

सध्यातरी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) 90-90-90 चा फॉर्म्युला चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. हा फॉर्म्युला चर्चेत असला तरी लोकसभेतील यशानंतर काँग्रेस शंभरहून अधिक जागांवर दावा करू शकते.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटही शंभरपेक्षा जास्त जागांसाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे घेतली तर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना माघार घ्यावी लागणार आहे.

Uddhav Thackeray News
Sharad Pawar Vs Ajit Pawar : पंधरा दिवसांच्या आतच शरद पवारांचा अजितदादांना पिंपरी चिंचवडमध्ये दुसरा धक्का, 'या' नेत्यांचा राजीनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com