Sharad Pawar Vs Ajit Pawar : पंधरा दिवसांच्या आतच शरद पवारांचा अजितदादांना पिंपरी चिंचवडमध्ये दुसरा धक्का, 'या' नेत्यांचा राजीनामा

NCP Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख आहे.पण याच अजित पवारांना एकाच महिन्यात दोन मोठे धक्के तेही याच शहरातून शरद पवारांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला आहे.यामुळे अजितदादा गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. त्याचवेळी ते अजित पवारांना (Ajit Pawar) सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या.

आता गव्हाणे यांच्यासह अजित पवार गटाच्या पिंपरी चिंचवड शहरातील इतर काही पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. यात यश साने, राहुल भोसले आणि भालेकर यांच्या नावाचा समावेश आहे. येत्या 20 जुलैला ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पिंपरी चिंचवड शहरात जाहीर सभा आहे. या सभेत अजित गव्हाणे आणि अजित पवार गटाचे इतर काही पदाधिकारी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात अजित दादा पवार यांना शरद पवार यांनी मोठा धक्का दिला आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Ajit Pawar Vidarbha Tour : अजितदादांचा विदर्भ दौरा, भेटीगाठी की झाडाझडती ?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी माजी नगरसेवकांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने संघटनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती. गव्हाणे हे मेळावा घेऊन काही नगरसेवकांसह लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोर यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.

Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar : भाजपचा डाव शरद पवार उलटवणार; माजी मंत्र्यांची घरवापसी होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com