Uddhav Thackeray : लवाद, 'लबाड', नार्वेकर आणि उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray PC on Shiv Sena MLA Disqualification : उद्धव ठाकरेंकडून राहुल नार्वेकर लक्ष्य
Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Rahul Narwekar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News :

दोन दिवसांपासून चर्चेत असलेली उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद झाली आणि 'जनता न्यायालय' या व्यासपीठावरून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीकेचे जहरी बाण सोडण्यात आले. यात उद्धव ठाकरे वापरलेला एक शब्द चांगलाच चर्चेत आला आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Shiv Sena MLA Disqualification verdict) राहुल नार्वेकरांचा निकाल ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात लागला. त्यावरून ठाकरे गटाकडून नार्वेकरांवर जनता न्यायालयाच्या माध्यमातून थेट टीकास्त्र सोडण्यात आले. त्यावेळी त्यांना लवादाचा उल्लेख लबाड असा केला.

Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Press Conference : 'हा सूर्य हा जयद्रथ' आता तरी... ; महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान!

त्याचवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar) थेट आव्हान करत सर्वांनी पोलिस संरक्षणाशिवाय यावे, तुम्हाला खरी शिवसेना दाखवतो, असे आव्हान दिले. यावेळी उद्धव ठाकरेंनी वारंवार लवादाऐवजी 'लबाड' उल्लेख करत राहुल नार्वेकरांना डिवचले

उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद दुपारी 4 वाजता होणार होती. पण मातोश्रीमधून उद्धव ठाकरेंनी प्रस्थान केलं तेच 4 वाजून 10 मिनिटांनी. ते 4 वाजून 35 मिनिटांनी वरळीतील महापत्रकार परिषदस्थळी दाखल झाले आणि त्यानंतर 4 वाजून 39 मिनिटांनी खऱ्या अर्थाने नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची चिरफाड सुरू झाली.

ही महापत्रकार परिषद चांगलीच गाजली. याचे टीझर ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्हायरल करण्यात आले होते. त्यामुळे सर्वांना उत्सुकता होती ठाकरे काय करणार? यावेळी संजय राऊत यांनी सुरुवातीला राहुल नार्वेकरांवर शाब्दिक हल्ला चढवला. 'त्यांची बायकोही निकाल मान्य करणार नाही', असा पहिला वार राऊतांनी राहुल नार्वेकरांवर केला.

त्यानंतर अॅड. असीम सरोदे, शिवसेना नेते अनिल परब, अॅड. रोहित शर्मा यांनी राहुल नार्वेकरांचा निकाला कसा चुकीचा आहे हे त्यांच्याकडील 'लाव रे तो व्हिडीओ' पद्धतीने दाखवण्यात आला. सहा वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पाच मिनिटांसाठी बाहेर गेले होते. त्यानंतर 18 मिनिटांच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांवर घणाघात केला. एवढेच कशाला पण कागदपत्रे मागवून काहीही न केल्यामुळे निवडणूक आयोगाला कोर्टात खेचण्याची भाषाही उद्धव ठाकरेंनी केली.

महापत्रकार परिषदेच्या निमित्ताने खुलेआम राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. शिवाय सुप्रीम कोर्टातदेखील धाव घेतली आहे. राहुल नार्वेकरांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोडून काढले आहेत. तरीही ठाकरे गटाने केलेली चिरफाड दिवस गाजवून गेली.

Rahul Narwekar, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Maha Press Conference : 'नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या, सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com