Mumbai News: BMC निवडणुकीपूर्वी ठाकरेंना मोठा धक्का; दोन माजी नगरसेवकांनी सोडली साथ

Major setback for Uddhav Thackeray in Mumbai two former corporators join the BJP: ईश्वर तायडे आणि आकांक्षा शेट्ट्ये यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षानं वर्धापनदिनानिमित्त शक्तीप्रदर्शन केले. वर्धापनदिनाला तीन दिवस होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोठा धक्का बसला आहे.

दोन माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. हा या नाटकाचा पहिला अंक आहे लवकरच दुसरा आणि तिसरा व शेवटचा अंक तुम्हाला पहायला मिळेल, असा टोला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्ष गळतीचे सत्र अद्यापही सुरु असल्याचे दिसते, या दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्या नसून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ईश्वर तायडे आणि आकांक्षा शेट्ट्ये अशी त्यांचे नावे आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यानंतर शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. मुंबईच्या विकासासाठी भाजप कठिबद्ध आहे, मुंबईत भाजप हा नंबर एकचा पक्ष झाल्याचा दावा शेलारांनी यावेळी केला.

Uddhav Thackeray
Ajit Pawar: शिवसेना नेत्यांच्या टार्गेटवर तटकरे का? अजितदादांनी सांगितलं कारण

भारतीय जनता पक्षाच्या ध्येयधोरणांशी एकरूप होऊन काम करणार असल्याचे ईश्वर तायडे आणि आकांक्षा शेठ्ये यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.

आम्ही मुंबईकरांची सेवा करीत असून देव, देश आणि धर्मासाठी आमची लढाई सुरु आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मुंबईला 5 लाख कोटींचा निधी दिला आहे, असेही शेलार म्हणाले.

2017 च्या निवडणूकीत त्यावेळच्या शिवसेनेपेक्षा भाजपाला फक्त दोन जागा कमी होत्या आता भाजपामध्ये चार माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यानंतर भाजपा नंबर 1 चा पक्ष झाला असल्याचे शेलार यांनी ठामपणे सांगितले. शिवाय मूळ शिवसेनेतील 50 हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट हा पक्ष अत्यंत जिर्ण अवस्थेत आहे, असा टोला शेलार यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com