Uddhav Thackeray vs Eknath Shinde  (1).jpg
Uddhav Thackeray vs Eknath Shinde (1).jpgSarkarnama

Thane Election Results: भिडला,लढला अन् जिंकलाही..! ठाकरेंच्या पठ्ठ्यानं थेट शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच पेटवली 'मशाल'; 'जायंट किलर' ठरत दिग्गज नेत्याला हरवलं

Uddhav Thackeray VS Eknath Shinde: उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत विधानसभा आणि नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकांची स्ट्राईक रेट कायम महापालिका निवडणुकीतही जोरदार मुसंडी मारली आहे.
Published on

Thane News: उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत विधानसभा आणि नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकांची स्ट्राईक रेट कायम महापालिका निवडणुकीतही जोरदार मुसंडी मारली आहे. शिंदेंनी ठाण्याची सत्ता काबीज करतानाच मुंबई,नाशिक यांसह इतर महापालिका निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे. पण आता एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मोठा धक्का बसला आहे.

ठाण्यातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 'शुभदिप'नावाचे निवासस्थान आहे. याच प्रभागात आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शहाजी (गणेश) संपत खुस्पे यांनी मोठा विजयम मिळवला आहे. खुस्पे यांनी या प्रभागात 5 टर्म नगरसेवक राहिलेले शिवसेना उमेदवार व माजी महापौर अशोक वैती यांना पराभवाचा धक्का दिला आहे.

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाण्याची ओळख आहे.पण आता याच बालेकिल्ल्यात आणि त्यातही शिंदेंचं निवासस्थान असलेल्या प्रभागातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाकडून नव्या दमाच्या शहाजी खुस्पे यांनी उमेदवारी मिळवली. नुसती मिळवलीच नाही,तर समोर वैती यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचं आव्हान असतानाही तो भिडला, लढला आणि सरतेशेवटी जिंकल्याचंही त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शहाजी खुस्पे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 12 हजार 860 मते मिळवली,तर शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांना 12 हजार 193 मतं मिळाली. या अटीतटीच्या लढतीत खुस्पे यांनी 667 मतांनी विजय खेचून आणला.या विजयामुळे खुस्पे हे जायंट किलर ठरल्याचं समोर आलं आहे.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde  (1).jpg
PM Modi Tweet: महाराष्ट्रात पुन्हा भाजपच 'बिग बॉस'; 29 पैकी 21 महापालिकांवर कमळ फुललं; PM मोदींचं पहिलं ट्विट, केलं मोठं विधान

ठाण्याचे दुसरे बाळासाहेब ठाकरे अशी ओळख असलेल्या दिवंगत आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून अशोक वैती यांची ओळख आहे. त्यांनी ठाणे महापालिकेचे महापौर,सभागृह नेतेपदासह ठाणे शिवसेनेचे शहरप्रमुख यांसारख्या महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. पण अखेर दांडगा जनसंपर्क असतानाही त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंच्या कट्ट्रर समर्थक राहिलेल्या शहाजी खुस्पे यांनी तगडं आव्हान उभं करत त्यांना पराभवाचा धक्काही दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com