Uddhav Thackeray Shivsena Dasara Melava : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे यंदाही दोन दसरा मेळावे होत आहेत. शिवाजी पार्कवरून ठाकरे गट, तर आझाद मैदानातून शिंदे गटाचा मेळावा होत आहे. त्यात दोन्ही गटांच्या नेत्यांकडून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हेदेखील शिंदे गटासह भाजपवर तुटून पडले.
ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होत आहे. या मेळाव्यात भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) यांनी पुन्हा आक्रमकशैलीत भाजपसह शिंदे गटावर टीकेची झोड उठवली. जाधव म्हणाले, २०२४ च्या निवडणुकीत जनता शिंदेंना धडा शिकवणार आहे.ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना मातीत गाडल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. उद्धव ठाकरेंचे विचार ऐकायला आपण आलो आहे. ते आपल्याला पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन करतील. यात माझ्या मनात शंका नाही, असं भास्कर जाधव यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भास्कर जाधव म्हणाले, कॅगचे कामकाज आता ठप्प करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. मागच्या दोन निवडणुकीत शिवसेना तुमच्यासोबत होती. आता तुमच्यासोबत नाही. सत्तेत तुम्ही राहणार नाही असेही ते म्हणाले. तसेच ज्यावेळी पुलवामामध्ये जवान शहीद झाले. त्यावेळी पंतप्रधान चित्रीकरणात व्यस्त असल्याची टीका जाधव यांनी केली.
ठाकरे सरकारच्या दसरा मेळाव्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी सरकारवर निशाणा साधला. दानवे म्हणाले, सरकार आपल्या दारी आणि मृत्यू येई घरी अशी अवस्था सध्या आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. महाराष्ट्रात औषध खरेदी वर्षभरात झालेली नाही. आता औषध खरेदी प्राधिकरण स्थापन करण्यात आलं आहे. मात्र, नव्या वर्षात एक रुपयाचं औषधही खरेदी झालं नाही, असा आरोपही दानवे यांनी आपल्या भाषणात केला.
दानवे म्हणाले, महाराष्ट्रात नवं सरकार आल्यापासून किती मृत्यू झाले तुम्हीच बघा. कळवा रुग्णालय, औरंगाबाद, बुलडाणा या ठिकाणी कसे मृत्यू झाले तुम्हाला माहीत आहेच, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. डॉक्टर्स उपलब्ध नाहीत, नर्सेस उपलब्ध नाहीत. खासदार येऊन फक्त नाटक करतो ,असं अंबादास दानवे म्हणाले.(Dasara Melava)
महाराष्ट्रात रोज ७० मुली आणि महिला रोज बेपत्ता होत आहेत. हे लोक बेटी बचावची घोषणा करत आहेत. या सरकारला लाज उरलेली नाही. खासगीकरण केलं जातं आहे. आत्ताचं सरकार हे खोटी आश्वासनं देतं आहे. लोकांना आशेला लावत आहे. मात्र, हे सरकार खोटं आहे. यांनी दिलेली आश्वासनं खोटी आहेत, असंही अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.