Mumbai News : मुंबईच्या माजी महापौर तथा एकेकाळच्या शिवसेनेच्या रणरागिणी किशोरी पेडणेकर बोलायला उभारल्या, की त्यांचा आवाज आणि दरारा पाहून अनेकांची बोलती बंद व्हायची. गेल्या दसरा मेळाव्यातील त्यांच्या धगधगत्या भाषणाने बंडखोरी करून बाहेर पडलेल्या ४० आमदारांची अक्षरशः पिसे काढली होती. यंदाच्या दसरा मेळाव्यात मात्र त्यांचा सूर हरपला होता. त्यांच्या भाषणातून वाघीण गरजली नसल्याचे दिसून आले. (Shivaji Park Dasara Melava 2023 : Dasara Melava of Thackeray group at Shivaji Park)
किशोरी पेडणेकर यांचा आवाज क्षीण झालेला आढळला, तर दहा मिनिटांच्या भाषणात प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह एक दोन नावे विसरल्याने वाघिणीने डरकाळी फोडलीच नाही, अशी चर्चा सभेच्या ठिकाणी रंगली होती, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ, उपनेत्या सुषमा अंधारेंचा आवाज मात्र गाजला. त्यांनी आपल्या ओघवत्या भाषणशैलीत भाजप, शिंदे गट, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका करीत त्यांचा आवाज कोणी दाबू शकत नाही, हे दाखवून दिले. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात सुरुवातीलाच शिवसेनेच्या रणरागिणी किशोरी पेडणेकर यांचे भाषण मात्र खूपच सौम्य वाटले. त्यांनी भाषणात केवळ महापालिका, शिंदे गटावर आरोप केले.
भाषणाच्या सुरुवातीलाच प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव घेता आले नाही. ‘ठाकरे बाबा’ अशा त्या म्हणाल्या, तर त्यांनी शिवसेना नेते सचिन अहिर यांचे नाव घेतले, पण आडनाव विसरले. त्यामुळे सभास्थळी एकच चर्चा रंगली होती. त्याशिवाय बरेचसे रेफरन्स त्यांना देता आले नाहीत, त्यामुळे वाघिणीने डरकाळी फोडलीच नाही, अशी चर्चा ऐकावयास मिळत होती.
दुसरीकडे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र तुफान फटकेबाजी केली. त्यांनी दहा मिनिटांच्या भाषणात सत्ताधारी पक्षांच्या सर्वच नेत्यांची बोलती बंद केली. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका केली. विशेषतः शेरोशायरी सादर करीत त्यांनी डरकाळी फोडत मुलुखमैदानी तोफ मात्र नेहमी पण गरजत टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.