Tejaswi Ghosalkar: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्या तेजस्वी घोसाळकरांना आरक्षण सोडतीचा मोठा फटका; तयारी केलेला वॉर्ड गमवावा लागणार

Mumbai Ward Reservation News: दहिसर मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या पत्नीनं काही महिन्यांपूर्वीच स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता. यानंतर त्यांची मातोश्रीवरुन समजूत काढण्यात आली होती.
Uddhav Thackeray | Tejasvi Ghosalkar
Uddhav Thackeray | Tejasvi Ghosalkar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यातील मुंबई,पुणे,ठाणे,पिंपरी चिंचवड,अहिल्यानगर यांसह अनेक बहुचर्चित महापालिकांच्या निवडणुकीकरिता सोमवारी जाहीर झालेल्या आरक्षणाच्या सोडतीनंतर वर्षानुवर्षे सांभाळलेल्या प्रभागातच काही प्रस्थापित माजी नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे, तर काही नगरसेवकांवर मागासवर्गीय आणि महिला आरक्षणामुळे दुसरा प्रभाग शोधण्याची वेळ ओढावली आहे.तर मुंबईतही काही दिग्गज नेत्यांना आरक्षणसोडतीचा फटका बसला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनं अनेक दिग्गजांना प्रभाग गमवावे लागले आहेत. आरक्षणाचा सर्वच पक्षातील जवळपास 30 माजी नगरसेवकांना फटका बसला आहे. त्यांना दुसरा प्रभाग शोधण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.आरक्षण सोड जाहीर होताच उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचे माजी आमदार व ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्वी घोसाळकर यांचीही सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ उडवून दिली आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या तेजस्वी घोसाळकर (Tejaswi Ghosalkar) गेल्या काही दिवसांपासून वार्ड क्रमांक 1 मधून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र, आता त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याची माहिती घोसाळकर यांनीच सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. त्या म्हणाल्या, सस्नेह जय महाराष्ट्र ! आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली. माझ्या वार्ड क्रमांक 1 मध्ये नागरिक प्रवर्ग म्हणजेच ओबीसी (OBC) आरक्षण घोषित झालं आहे. मी ओबीसी प्रवर्गातील नसल्यामुळे ही निवडणूक लढवू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत दुःखद आहे. परंतु दुःख ह्याचे नाही की, मी निवडणूक लढवू शकत नाही, दुःख हे आहे की, मी आता माझ्या प्रभागातील तसेच दहिसर विधानसभा मतदारसंघातील सामान्य माणसाची सेवा प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी म्हणून करु शकणार नसल्याचंही तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray | Tejasvi Ghosalkar
Nagpur Congress News: काँग्रेसचा सुनील केदार अन् बैस यांना मोठा दणका; प्रदेशाध्यक्ष सपकाळानंतर पक्षानेही काढले महत्त्वाचे आदेश

तेजस्वी घोसाळकर पोस्टमध्ये म्हणतात, ‘या निर्णयामुळे माझ्या जनसेवेचा मार्ग थांबणार नाही. कारण अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या घोसाळकर कुटुंबीयांइतकीच साथ मला ह्या प्रभागातील तसेच दहिसर-बोरिवलीतील सगळ्या लोकांनी दिल्याचंही त्या म्हणाल्या.

म्हणूनच आज, उद्या आणि येणाऱ्या प्रत्येक काळात, माझ्या प्रभागातील, तसेच संपूर्ण दहिसर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी, त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक किंवा सार्वजनिक अडचणींसाठी, मी नेहमीप्रमाणेच, अर्ध्या रात्रीसुद्धा त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहीन, ही माझी मनापासूनची खात्री आणि वचनही शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी दिलं.

Uddhav Thackeray | Tejasvi Ghosalkar
Bihar Exit Polls 2025: बिहारमध्ये नितीश कुमारांची जोरदार मुसंडी, तर मोदींच्या 'हनुमाना'ला मोठा झटका; 'ओपिनियन पोल'मधून धक्कादायक आकडेवारी समोर

दहिसर मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या पत्नीनं काही महिन्यांपूर्वीच स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता. यानंतर त्यांची मातोश्रीवरुन समजूत काढण्यात आली होती. यानंतर त्यांची भाजपचं वर्चस्व असलेल्या मुंबई बँकेच्या संचालक मंडळातही वर्णी लागली होती. यानंतर तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांनाही उधाण आले होते. पण उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांनी आपण शिवसेनेतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

फेसबुक लाईव्ह सुरु असताना अभिषेक घोसाळकर यांची मॉरीस नरोन्हाने हत्या केली होती. या हत्येनं मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या हत्येनंतर तेजस्विनी घोसाळकर यांनी गेल्या काही दिवसांपासून वॉर्ड क्रमांक 1मधून निवडणुकीची तयारी सुरू केली होती.पण आता हाच वॉर्ड मागासवर्ग प्रवर्ग (OBC) म्हणून आरक्षित झाला आहे. त्याचमुळे त्यांना आता या वॉर्डमधून निवडणूक लढवता येणार नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com