Shiv Sena dispute update : निवडणुकीच्या धामधुमीत शिंदेंना अडचणीत आणण्याचा ठाकरेंचा प्लॅन; सुप्रीम कोर्टात मोठी मागणी करणार?

Uddhav Thackeray’s Possible Supreme Court Move : पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने केला जातो. असे असले तरी प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये मात्र मतदारांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झुकते माप दिल्याचे विधानसभा निवडणुकीत दिसून आले.
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Political Impact Before Local Body Elections : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. दिवाळीनंतर निवडणुकांची धामधूम सुरू होईल. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुका टप्प्या-टप्प्याने घेतल्या जाणार आहेत. पण या धामधुमीत सुप्रीम कोर्टातही सत्तासंघर्ष सुरू असणार आहे. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत भारतीय निवडणूक आयोगालाने दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. ठाकरेंच्या या याचिकेवरून 12 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सुनावणीला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांच्याकडून सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे असलेले पारंपरिक धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याची मागणी केली जाऊ शकते.

‘साम टीव्ही’ने याबाबत वृत्त दिले आहे. याचिकेवर निकाल येईपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले जावे, अशी मागणी ठाकरेंकडून कोर्टात केली जाण्याची शक्यता असल्याचे वृत्तात म्हटले आहे. ठाकरेंनी ही मागणी केली तरी कोर्ट त्यावर काय निकाल देणार, याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आयोगाने शिंदेची शिवसेनाच मुळ असल्याचा निर्णय देत धनुष्यबाण चिन्हही त्यांच्याच पक्षाला बहाल केले होते. तर ठाकरेंना मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Ajit Pawar News : योगेश कदम अडचणीत येणार? अजितदादांनी घातलं लक्ष; थेट पोलीस आयुक्तांशी बोलले अन् वेगळीच माहिती आली समोर...

पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने केला जातो. असे असले तरी प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये मात्र मतदारांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झुकते माप दिल्याचे विधानसभा निवडणुकीत दिसून आले. लोकसभेत ठाकरेंची शिवसेना किंचित सरस ठरली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही नेते पहिल्यांदाच समोरासमोर असणार आहेत.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
ई-बसचा प्रवास झाला स्वस्त; ‘एसटी’ने आणली धमाकेदार योजना, एकदा वाचाच...

दोन्ही शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. आपली सत्ता कायम राखण्यासाठी ठाकरे प्रयत्नशील आहेत. तर त्यांच्या हातून सत्ता खेचून घेण्यासाठी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून रणनीती आखली जात आहे. युतीच्या चर्चा सुरू असून निवडणुकीच्या तोंडावर याबाबत घोषणा होऊ शकते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टातील निकालाकडेही अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com