
Uddhav Thackeray News : लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडी बाजी मारेल, अशी शक्यता होती. मात्र, अवघ्या सहा महिन्यांत महायुतीने सत्ता खेचून आणली. महायुतीचा विजय येवढा भव्य होता की महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याच्या चर्चा त्यानंतर सुरू झाल्या. त्यातच मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.
मुंबई महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार असल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे काँग्रेसने देखील आपण स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुंबईतील 50 टक्के जागा स्वबळावल लढण्याची तयारी असल्याचे समोर आले होते. मात्र, महाविकास आघाडीतील पक्ष स्वबळावर लढले तर त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
महाविकास आघाडीची आज (मंगळवारी) मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीच्या आधी सोमवारी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल दीड तास शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेवेळी खासदास संजय राऊत आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते.
आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीची रणनिती काय असावी, यासंदर्भातमध्ये ठाकरे पवार यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज संस्था स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या उद्धव ठाकरे यू टर्न घेत निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीची आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील समन्वया संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक स्वराज संस्था निवडणूक एकत्रित लढण्यासंदर्भात तसेच आगामी काळात सरकारला घेरण्याच्या विषयावर तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 25 जानेवारीला निघणाऱ्या आक्रोश मोर्चा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.