Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची इनसाईड स्टोरी वेगळीच! गुप्ता बंधूंसोबत भेट? शिंदे गटातील नेत्याचा खळबळजनक आरोप...

Shivsena Shinde group on Uddhav thackeray Delhi Tour: ठाकरेंच्या या दिल्ली भेटीवरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी विरोधकांनी ठाकरेंवर काही गंभीर आरोप देखील केले आहेत.
Shivsena Shinde group on Uddhav thackeray Delhi Tour
Shivsena Shinde group on Uddhav thackeray Delhi TourSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर सहकुटुंब गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यावरून शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरेंच्या या दिल्ली भेटीवरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी विरोधकांनी ठाकरेंवर काही गंभीर आरोप देखील केले आहेत.

'उद्धव ठाकरेंचा (Shivsena) सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला. मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते, पण काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही. संजय राऊत यांनी स्वतःच राजकीय महत्व वाढवणं आणि उद्धव ठाकरे यांना मी कस नाचवू शकतो हे दाखवणारा हा दौरा होता. निवडणुकीत फंड गोळा करण्यासाठी हा दौरा झाला आहे.' अशी टीका नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) हा दिल्ली दौरा म्हणजे 'दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणणारा होता', असा गंभीर आरोप म्हस्के यांनी यावेळी केला. गुप्ता बंधु काहीच महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आले होते. ही भेट मुंबईत झाल्यास सरकारला समजेल म्हणून त्यांनी हा दिल्लीत दौरा आखण्यात आला असेल. संजय राऊत यांनी सात तारखेला दुपारी ही भेट घडवून आणल्याच दिसत आहे. ही भेट कशासाठी झाली याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. ज्या माणसाने एका देशाला फसवल त्यांची भेट का घेतली?' असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला.

Shivsena Shinde group on Uddhav thackeray Delhi Tour
Raj Thackeray Vs Shivsena : राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे पदाधिकारी आमचेच; पण.... : शिवसेना नेत्याचा मनसेला इशारा

'त्यांच्या घरातील CCTV बंद केलेले असतील तर रस्त्यावरचे सीसीटीव्ही किंवा त्यांचे फोन तपासा. संजय राऊत यांनी आधी खुलासा करावा', अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे. मुंबई महापालिकेतून येणारे कंटेनर बंद झाले म्हणून आता नवीन फंड साठी हा दौरा होता का ? असंही म्हस्के यावेळी म्हणाले.

कोण आहेत गुप्ता बंधू ?

आफ्रिकन देशातील सरकारी उद्योगांमधून अब्जावधींची लूट केल्याप्रकरणी गुप्ता बंधूंवर गुन्हा दाखल आहे. अतुल गुप्ता, अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधून दक्षिण आफ्रिकेत अब्जावधी रँड्सचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. जेकब झुमा 2018 मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर हे तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते. तिथे त्यांना अटकही झाली होती.

Shivsena Shinde group on Uddhav thackeray Delhi Tour
Kolhapur Congress : काँग्रेसच्या जयश्री जाधव पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात; 'कोल्हापूर उत्तर'च्या जागेवरुन राजकारण तापणार

अजय, अतुल आणि राजेश गुप्ता हे मूळचे उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे. अतुल गुप्ता यांनी पहिल्यांदा चपलांचा व्यवसाय केला आणि नंतर सहारा कॉम्प्युटर सुरू केले. त्यानंतर त्यांनी खाणकाम, हवाई प्रवास, ऊर्जा आणि माध्यम यांसारख्या उद्योगांमध्ये स्वतःचा विस्तार केला

कंपनीच्या एका कामानिमित्त 1993 मध्ये दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले. तिथे त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राजकारणी जेकब झुमा यांची भेट घेतली. झुमा 2009 ते 2018 पर्यंत देशाचे अध्यक्ष होते. गुप्ता बंधूंवर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी झुमाशी असलेल्या त्यांच्या संबंधांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे ज्यामुळे या प्रक्रियेत सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान झाले. 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेत अतुल गुप्ता हे 10 सर्वात श्रीमंतांच्या यादीत होते आणि त्यांची संपत्ती 700 दशलक्ष डॉलर इतकी होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com