Raj Thackeray Vs Shivsena : राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे पदाधिकारी आमचेच; पण.... : शिवसेना नेत्याचा मनसेला इशारा

Raj Thackeray Marathwada Tour : आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि बीडमध्ये हे आंदोलन सुरू आहे. त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं. त्या विरोधात सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
Raj Thackeray-Sanjay Raut
Raj Thackeray-Sanjay RautSarkanama
Published on
Updated on

Mumbai, 10 August : राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या, ते शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात. पण, त्या आंदोलनाशी आमचा शिवसेना पक्ष म्हणून काही संबंध नाही.

ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले. त्याचवेळी मनसेने आम्हाला धमक्या देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गाडीसमोर आंदोलन करण्यात आले होते. ते शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी त्या आंदोलनाशी शिवसेनेचा कोणताही संबंध नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि बीडमध्ये हे आंदोलन सुरू आहे. त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं. त्या विरोधात सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

Raj Thackeray-Sanjay Raut
Pune Drugs Case : पुण्यात चाललंय तरी काय? एक कोटीचे ड्रग्स पुन्हा सापडले

बीडमध्ये शिवसेनेची ताकद जास्त असेल, त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील. त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही. मी असं म्हणत नाही ते आमचे कार्यकर्ते नसावेत, ते 100 टक्के आमचे कार्यकर्ते असतील, पण ते आंदोलन पक्षाचं नव्हतं. हे मी स्पष्ट करतो.

मनसेने दिलेल्या इशाऱ्याबाबत संजय राऊत म्हणाले, धमक्या, इशारे देऊ नका, ते भाजपला द्या, देवेंद्र फडणवीसंना द्या, महाराष्ट्रद्रोह्यांना द्या. जेव्हा राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या टाकल्या, तेव्हा आम्ही दिल्लीत होतो. लोकशाहीमध्ये सर्वांना निषेध करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने वातावरण बिघडवलं जातंय, ते पाहता भविष्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी या विषयावर संयम पाळणं गरजेचं आहे

सिसोदिया यांच्यावर एका पैशाचाही आरोप नाही

मनीष सिसोदिया यांना 17 महिन्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. एका व्यक्तीला छळ कपटाने जेलमध्ये कशा प्रकारे टाकलं जातं. 17 महिने त्याला जामीन दिला जात नाही, त्यांचे अधिकार हेरून घेत आहेत, मीसुद्धा या वेदना सहन केल्या आहेत. अनिल देशमुख, संजय सिंह खूप लोकांना आम्ही बघितलं आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray-Sanjay Raut
BJP Vs Shivsena UBT : अर्धवटराव, बालिश, विनोदबुद्धी अन् थेट ठाकरेंच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह; बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

मनीष सिसोदिया यांच्यावर एक पैशाचा आरोप नाही. माझ्या माहितीनुसार एक पैसाही त्यांच्याकडून जप्त केलेला नाही. भारतीय जनता पार्टी मनी लॉन्ड्रींची बादशहा आहे. मनी लॉन्ड्रींची रिझर्व्ह बँक आहे. त्यांच्याकडे एवढा पैसा मनी लॉन्ड्रीगमधून येतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com