Uddhav Thackeray On Fadnavis: फडणवीस फक्त मस्टरवर एन्ट्री करणारे राहणार; उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं

Uddhav Thackeray On BJP : "संपूर्ण भाजप उभा राहिला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना संपवू शकत नाही..."
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा संयुक्त मेळावा रविवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोले लगावले. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करत फडणवीसांची मला दया येते, फडणवीस फक्त मस्टरवर एन्ट्री करणारे राहणार आहेत, असे म्हणत ठाकरेंनी भाजपसह फडणवीसांना डिवचले.

"देवेंद्र फडणवीस तुम्ही किती ओझी वाहणार आहात. दया येते मला त्यांची. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. एक चोरला, दुसरा चोरला, आता काँग्रेस देखील फोडणार असे म्हणतात. किती उपमुख्यमंत्री करणार?, मग काय फडणवीस फक्त मस्टरवर एन्ट्री करणारे राहणार का?", असा घणाघात ठाकरेंनी केला.

Uddhav Thackeray
Prakash Ambedkar News : '' भाजप घरी चहा प्यायला आला तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे , पण...''; 'फ्रेंडशिप डे'लाच आंबेडकरांचं सूचक विधान

"भाजप संपूर्ण उभा राहिला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना संपवू शकत नाही. आम्हाला थप्पड देण्याची कुणाची हिम्मत नाही. ठाकरेंच्या घराण्याला इतिहास आहे. आमच्या सहा, सात पिढ्या जनसेवा करत आहेत. ज्यांना आगापीछा नाही, त्यांनी टीका करू नये", अशा शब्दात ठाकरेंनी भाजपला आव्हान दिलं.

Uddhav Thackeray
Fadnavis On Jayant Patil: शाह - जयंत पाटलांच्या भेटीचं खुद्द फडणवीसांनीच केलं खंडन !

"आमचे हिंदुत्व-हिंदुत्व आहेच, ते कोणीही बदलू शकत नाही. पण काळानुसार काही भूमिका घ्याव्या लागतात. तशा प्रबोधनकारांनी घेतल्या, बाळासाहेबांनी घेतल्या आणि आता मी घेतोय. देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार असताना 'हिंदू आक्रोश मोर्चा' का काढावा लागतो?, असा सवालही ठाकरेंनी भाजपला केला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com