Mashal Symbol : उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार? समता पार्टीचा मशाल चिन्हावर दावा!

Samata Party Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे भाड्याची मशाल वापरत असल्याचा टोलाही लगावला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Samata Party Vs Uddhav Thackeray : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाचीच असल्याचे सांगत उद्धव ठाकरे गटाला चांगलाच धक्का दिला आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी कल्याण येथे केलेल्या पहिल्या दौऱ्यात आम्ही मशाल चिन्ह घेऊन लढू, असे सांगितले. मात्र आता हे मशाल चिन्हदेखील त्यांना वापरता येणार नसल्याचे दिसून येत आहे.

कारण, समता पार्टीने मशाल चिन्हाबाबत पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या नवीन नोटिफिकेशननुसार निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या कागदपत्रांची पूर्तता केल्याची माहिती समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी दिली आहे.

विधानसभाध्यक्षांनी शिवसेना (Shivsena) शिंदेंचीच असा निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी संघर्ष सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावरदेखील दावा करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या नवीन नोटिफिकेशननुसार निवडणूक आयोगाकडे पक्षासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता केली असून, मशाल चिन्ह आम्हाला मिळावे, यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी सांगितले. तसेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Mankoli Bridge : माणकोली पूल ठरणार निवडणुकीचा मुद्दा, विरोधक करणार विजयाचा दावा

यावेळी निवडणूक आयोगाने दाद न दिल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे मंडल यांनी सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या मेहेरबानीमुळे त्यांना हे चिन्ह पुढेदेखील मिळाले, तर मशाल हे चिन्ह समता पार्टीचे आहे मशाल समता पार्टीची ओळख आहे, असे सांगितले.

उद्धव ठाकरे भाड्याची मशाल वापरत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रांची पूर्तता केली आहे, त्यामुळे हे मशाल हे चिन्ह आम्हालाच मिळेल, लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्ह त्यांच्याकडून जाणार आहे आणि ते समता पार्टीकडे येणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मशाल चिन्हावर समता पार्टीचे उमेदवार उतरणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Uddhav Thackeray
NCP Ajit Pawar : अजित पवार गटाचं मुंबईत शक्तिप्रदर्शन; भुजबळांचं मोठं विधान, शिंदे गटाला डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com