Raigad Lok Sabha Constituency महिला मतदार ठरविणार रायगडचा खासदार !

Maharashtra Lok Sabha Election 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील अलिबाग,पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरी जिल्ह्यांतील दापोली आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.
Raigad Lok Sabha
Raigad Lok SabhaSarkarnama

Alibaug news : लोकसभेची रणधुमाळी जोरदार सुरू झाली असून, राजकीय पक्षांची मंडळी उमेदवारांच्या प्रचारात गुंतली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लाख 53 हजार 935 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्‍या 8 लाख 13 हजार 515 आहे, तर महिला मतदारांची संख्‍या 8 लाख 40 हजार 416 आहे. पुरुष मतदारांच्‍या तुलनेत महिला मतदारांची संख्‍या 26 हजार 901 ने अधिक आहे. प्रत्यक्ष मतदानातदेखील अनेक मतदारसंघात महिलांची टक्केवारी नेहमीच अधिक राहिलेली आहे, त्‍यामुळे दिल्‍लीतील लोकसभेत रायगडचा खासदार कोण पाठवायचा हे ठरविण्यात महिला मतदार निर्णायक भूमिका बजाविणार आहेत.

रायगड (RAIGAD) मतदारसंघातील महिलांच्या टक्केवारीमुळे राजकीय पक्षांकडूनदेखील महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. हळदी कुंक समारंभ, साडी वाटप, भांडी वाटप, मुलींसाठी सायकल वाटप, तर कधी महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय असे कार्यक्रम घेतले जात आहेत. रायगड जिल्‍ह्यात मावळ आणि रायगड अशा दोन लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raigad Lok Sabha
Lok Sabha Election 2024 : प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश

या तीन मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे, तर रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार दापोली, गुहागर या मतदारसंघात महिला मतदारांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लोकसभा (LOKSABHA) निवडणुकीत महिला मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या मतदारसंघात आगरी, कोळी, कुणबी या समाजाची संख्या अधिक आहे. या समाजामध्ये महिलांच्या हातात कुटुंबाची आर्थिक सूत्रे असतात. पुरुषांनी काम करायचे आणि तयार झालेल्या मालाची विक्री करून घर खर्चावर महिलांनी नियंत्रण ठेवायचे, अशी पद्धत आहे. या भागातील मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण जास्त असल्याने कुटुंबातील महत्त्वाच्या निर्णयात महिलांचा पुढाकार जास्त असतो. राजकारणातही येथील महिलांना मानाचे स्थान आहे. त्यातच या महिला नोकरीनिमित्ताने शहरात न जाता गावातच राहत असल्याने प्रत्येक निवडणुकांमध्ये त्या सातत्याने मतदान करीत असतात. याचा फायदा निवडणुकीत व्हावा, यासाठी सर्वच राजकीय पक्षांची मंडळी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

Raigad Lok Sabha
Sharad Pawar News : होय, मी भटकती आत्मा, पण...; शरद पवारांचे मोदींना उत्तर!

85 पेक्षा अधिक वय असलेले 37 हजार मतदार

निवडणूक आयोगाने दिव्‍यांग आणि 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्‍या मतदारांना मतदानाचा हक्‍क बजावता यावा, यासाठी विशेष सुविधा पुरवण्‍याचा निर्णय घेतला आहे. या मतदारांना घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्‍ह्यात 11 हजार 282 दिव्‍यांग मतदार आहेत तर 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले 37 हजार 736 मतदार आहेत. दिव्‍यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्‍प तसेच व्‍हीलचेअरची व्‍यवस्था असेल तर 85 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मतदारांना घरी बसून मतदानाचा हक्‍क बजावता येणार आहे. या वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यात अडचणी येत होत्या. मात्र, यंदा निवडणूक आयोगाने केलेल्या विशेष व्यवस्थांमुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केला आहे.

R

Raigad Lok Sabha
Thackeray Vs Shinde: ठाकरेंचा शिलेदार शिंदे गटाच्या गळाला; आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकरांवर नाराज असल्याने...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com