
Vidhan Bhavan : आव्हाड विरुद्ध पडळकर हा वाद आता विधानभवनापर्यंत पोहोचला आहे. विधान भवनाच्या लॉबीमध्ये दोन्ही समर्थकांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, यामध्ये एकमेकांचे कपडे देखील फाडले गेले. या प्रकारामुळं विधानभवनाचं पावित्रच भंग झालं आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याचा रिपोर्ट मागवला असून त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं.
विधानभवनाच्या लॉबीमध्ये साडेपाच ते सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. यावेळी लॉबीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. खरंतर विधानभवनाच्या प्रांगणात सर्वसामान्यांना पासशिवाय सोडलं जात नाही. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते त्या ठिकाणी कसे आले? हा प्रश्न विचारला जात आहे. या लोकांना ज्यांनी पास दिले त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हे पास देण्याचे अधिकार अध्यक्षांना असतात, त्यामुळं अध्यक्षांची देखील दिशाभूल करण्यात आली आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान, सकाळी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन सांगितलं होतं की, गोपिनाथ पडळकर यांच्या कार्यकर्त्यानं आपल्या फोनवर मेसेजद्वारे वाईट शिवीगाळ करुन मारहाणीची धमकी दिली होती, असा आरोप केला होता. त्यानंतर संध्याकाळी हा सर्व प्रकार घडला. या प्रकारावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की, हे पडळकरांचे गुंड असून माझ्यावर हल्ला करण्यासाठीच ते विधानभवनात घुसले होते. तुमच्याकडं सत्ता आहे म्हणून तुम्ही कसंही वागणार का? असा सवाल करताना विधानभवनातही आमदार सुरक्षित नाहीत, तर कशाला राहायचं आमदार. काय गुन्हा आहे आमचा? सत्तेचा एवढा मुजोरपणा! अशा शब्दांत आव्हाडांनी संताप व्यक्त केला.
या हाणमारीवर पत्रकारांनी प्रश्न विचारताच गोपिचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया देताना आपल्याला काहीही माहिती नाही. नेमकं काय झालंय हे आपण पाहिलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.