MVA Politics : विधान परिषद अन् विधानसभेबाबत महाविकास आघाडीत खलबतं; नेमकं काय ठरलं?

Vidhan Parishad Election : विधान परिषदेत मतांची फाटाफूट होणार आहे. मात्र आपले तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीने रणनीती आखली आहे.
MVA
MVASarkarnama
Published on
Updated on

वैदेही कानेकर

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर महाविकास आघडीतील घटक पक्षांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. सध्या राज्यात विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून यात आम्हीच बाजी मारणार, असा दावा आघाडीकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीची शुक्रवारी बैठक पार पडली. यात या दोन्ही निवडणुकांच्या रणनीतीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतांची फोडाफोडी होणार असून कोणत्या पक्षाची आमदार फुटणार याबाबत आताच चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, आघाडीच्या बैठकीत विधान परिषदेच्या मतांची जुळवाजुळव व्हावी, यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली आहे.

येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असताना कोणत्या मुद्द्यांवर मतदारांसमोर जायचे, महाविकास आघाडीचा नेमका जाहीरनामा कसा असेल? कोणते मुद्दे प्रचारात विधानसभेच्या महत्त्वाचे ठरतील या सगळ्या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते आहे.

MVA
Ajit Pawar On Suryakumar : अजितदादांनी सूर्यकुमारला भरला दम; म्हणाले, ' नाहीतर आम्हीही तुझ्याकडं पाहिलं असतं...'

महाविकास आघाडी मिळून एकत्रित लढल्यास लोकसभेप्रमाणे विधानसभेतही चांगले यश मिळवू शकतो, हा विश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जणार आहेत. तसेच विधान परिषदेनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचाही कार्यक्रम लागणार आहे. त्यासाठी लवकरच जागावाटप करण्याबाबतही चर्चा सुरू केल्या जातील. या बैठकीत जागावाटपाच्या अनुषंगाने प्राथमिक झाली.

महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष आणि इतर घटक पक्ष यांची जिल्हास्तरावर एकजूट निर्माण होऊन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सभा मेळाव्यांचा आयोजन केले जाणार आहे. मुंबईमध्ये राज्यभरातील तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला जाणार आहे. या मेळाव्यातून लोकसभेत पाठिंबा दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले जातील. याच मेळाव्यातून आघाडी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

MVA
Manoj Jarange : अशोक चव्हाण अन् संदीपान भुमरे तातडीने मनोज जरांगेंच्या भेटीला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com