विखेंनी केली थोरातांची कोंडी : प्रवरा नदी प्रदुषणाचा विषय विधानसभेत गाजला

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी प्रवरा नदी प्रदुषणाचा विषय लक्षवेधीत मांडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांची कोंडी केली.
Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat Sarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई - विधानसभेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी प्रवरा नदी प्रदुषणाचा विषय लक्षवेधीत मांडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांची कोंडी केली. त्यामुळे संगमनेर नगरपालिका व दूध संघाने केलेल्या प्रवरा नदी प्रदुषणाचा विषय आज राज्यभर चर्चेचा ठरत आहे. ( Vikhe brought Thorat into trouble: The issue of Pravara river pollution was raised in the assembly )

आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी अर्थसंकल्‍पीय आधिवेशनात प्रवरा नदीपात्रात सोडण्‍यात येत असलेल्‍या प्रदुषित पाण्‍याच्‍या संदर्भात लक्षवेधी प्रश्‍न उपस्थित करुन, सरकारचे लक्ष वेधले. सहकारी संस्‍थांना विरोध नाही परंतु या संस्‍थाच्‍या माध्‍यमातून सोडण्‍यात येत असलेल्‍या प्रदुषित पाण्‍याचा मोठ्या प्रमाणात त्रास नदीकाठच्‍या गावातील नागरिकांना तसेच शेतीक्षेत्राला होत आहे. यापैकी बहुतांशी गावे ही शिर्डी मतदार संघात येत असल्‍याचे त्‍यांनी सभागृहात सांगितले. या गावातील ग्रामस्‍थांनी महाराष्‍ट्र राज्‍य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारीही केल्‍या, मात्र याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आधिकाऱ्यांवर तसेच महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण कायद्यांन्‍वये प्रदुषित पाणी सोडणाऱ्या संस्‍थावर काय कारवाई करणार असा प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित केला.

Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, निळवंडेच्या गप्पा मारणारे 30 वर्षांपूर्वी कुठे होते...

प्रवरा नदीपात्रात संगमनेर नगरपरिषद आणि तालुका दूध संघातून सोडण्‍यात येणाऱ्या प्रदुषित पाण्‍यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या उपस्थितीत लवकरच बैठक घेवून संबधित संस्‍थाची चौकशी करण्‍याचे आश्‍वासन राज्‍यमंत्री संजय बनसोड यांनी दिले.

राज्यमंत्री संजय बनसोड यांनी या गंभीर विषया संदर्भात पर्यावरण मंत्र्यांच्या उपस्थितीती तातडीने बैठक घेण्‍याचे आश्‍वासन देतानाच प्रवरा नदीपात्रात प्रदुषित पाणी सोडणाऱ्या सहकारी संस्‍था आणि स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थावर महाराष्‍ट्र प्रदुषण मंडळाच्‍या माध्यमातून कारवाई करण्‍याची ग्‍वाही दिली.

Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, पिछेहाटीत काँग्रेस नेतृत्वाचा काही दोष नाही...

या प्रदुषित पाण्‍यासंदर्भात नदीकाठच्‍या गावातील नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. यासाठी कृती समितीही स्‍थापन केली आहे. त्‍यामुळे विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या उपस्थितीत येत्‍या आठवड्या भरातच बैठक घ्‍यावी, अशी मागणी सभागृहात केली. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनीही ही बैठक लवकरच घेण्‍याचे आमदार विखे पाटील यांना आश्‍वासीत केले.

दरम्‍यान याच आधिवेशनात आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी तारांकीत प्रश्‍नांच्‍या माध्‍यमातून सरकारकडे या प्रदुषित पाण्‍याबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नाला पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी सुध्‍दा लेखी उत्‍तर दिले असून, महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत संगमनेर नगरपरिषदेला घरघुती सांडपाणी यंत्रणा उभारणे बाबत व पर्यावरण नुकसान भरपाई का लादू नये असे निर्देश 26 ऑक्‍टोबर 2021 रोजी दिले होते. त्‍यानंतर हरित लवादाकडे दाखल झालेल्‍या अर्जानुसार 15 जुलै 2020 रोजी पारित केलेल्‍या आदेशास अनुसरून महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत संगमनेर नगरपरिषदेला पर्यावरण नुकसान भरपाई म्‍हणून 5 कोटी 40 लाख रुपये जमा करण्‍याबाबत 2 मार्च 2022 रोजी निर्देश दिले असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

Radhakrishna Vikhe Patil vs Balasaheb Thorat
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

प्रदुषण मंडळाची कारवाई

महाराष्‍ट्र प्रदुषण मंडळाने 14 डिसेंबर 2021 रोजी केलेल्‍या पाहणीत संगमनेर तालुका दूध संघाच्‍या डेअरीमधून पांढऱ्या रंगाच्‍या पाण्‍याचा विसर्ग काही प्रमाणात कारखाना परिसराबाहेर चेंबर होत असल्‍याचे निदर्शनास आले होते. त्‍यामुळे सदर उद्योगास महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने 22 डिसेंबर 2021 रोजी प्रस्‍तावित निर्देश दिले असून, त्‍यानुसार सदर उद्योगाची 2 लाख 50 हजार रुपयांची बॅंक हमी महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने जप्‍त केली असल्‍याचे या लेखी उत्‍तरात म्‍हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.