Voter List: मुंबईतील मतदार याद्या मराठीत नव्हे तर गुजराती अन् इतर भाषांमध्ये! मनसे आक्रमक, अधिकाऱ्यांवर भिरकावल्या याद्या

Voter List:महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आणण्याचं काम मनसेकडून सुरू आहे.
Nashik Voter List Scam
Nashik Voter List ScamSarkarnama
Published on
Updated on

Voter List: मुंबईतील मतदार याद्या या मराठीत असण्याऐवजी इतर भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये गुजरातीसह इतर काही भाषांमधील याद्या पाहिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक होत थेट निवडणूक अधिकाऱ्यांवर या याद्या फेकत त्यांना धारेवर धरलं. मनसेचे चारकोप विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी यावरुन निवडणूक कार्यालयावर धडक मोर्चाही काढला.

Nashik Voter List Scam
Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांचं अर्थमंत्री सीतारामन यांना पत्र! केली महत्त्वाची मागणी

नेमका विषय काय?

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आणण्याचं काम मनसेकडून सुरू आहे. मतदार याद्यांमध्ये सर्वाधिक घोळ हा चारकोप मतदार संघात आढळून आला आहे. या सोबतच अनेक मतदारांची नावे मराठी ऐवजी गुजराती, बंगाली, ओडिया आणि तामिळ भाषेत देखील आढळून आल्यामुळं मनसे आक्रमक झाली आहे. मनसे चारकोप विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी याच मुद्द्यावर आक्रमक होत चारकोप विधानसभा निवडणूक अधिकारी कार्यालयात धडक मोर्चा काढला. यावेळी परभाषेत छापण्यात आलेल्या मतदार याद्या दिनेश साळवी यांनी निवडणूक अधिकाऱ्याच्या तोंडावर फेकून, या याद्या त्वरित मराठीमध्ये कराव्यात अशी मागणी केली तसंच जर वेळेत यात सुधारणा झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही साळवी यांनी यावेळी दिला.

Nashik Voter List Scam
Nagpur Election: ठाकरेंच्या शिवसेनेचा शहरप्रमुख काँग्रेसमध्ये! मनपा निवडणुकीपूर्वीच तीन प्रमुख उमेदवार पळवले

मतदार याद्या इतर भाषांमध्ये असू शकतात का?

प्रतिनिधित्व हक्क कायदा, १९५१ (Representation of the People Act, 1951) आणि निवडणूक नियम, १९६१ (Conduct of Elections Rules, 1961) नियम २३ नुसार भारतीय निवडणूक आयोगाला मतदार याद्या संबंधित मतदारसंघ क्षेत्राच्या भाषेत तयार केल्या जातात. यामध्ये राज्याच्या अधिकृत भाषेला प्राधान्य असते. पण जर एखाद्या मतदारसंघात इतर राज्यांतील भाषिक लोकसंख्या मोठी असेल (जसं मुंबईत बंगाली किंवा तेलुगू बोलणारे), तर निवडणूक आयोग बहुभाषिक फॉर्म (multi-lingual forms) प्रसिद्ध करू शकते. हे फॉर्म राज्याच्या भाषेसोबतच इतर भाषांमध्ये (जसे हिंदी किंवा इंग्रजी) उपलब्ध होतात. मात्र, मुख्य यादी राज्याच्या भाषेतच तयार केली जाते.

सेवा मतदारांसाठी (service voters) उदा. सैनिकी कर्मचारी यांची यादी इंग्रजीत तयार केली जाते. कारण ते देशभर किंवा परदेशात असू शकतात. ही इंग्रजीतील यादी 'इतर राज्यांच्या भाषा' या व्याख्येत येत नाही, पण बहुभाषिकतेचा भाग आहे. भारतीय निवडणूक आयोगाला कलम ३२४ अंतर्गत मतदार याद्या तयार करण्याचा आणि त्यात बदल करण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या भागात इतर भाषिक लोक मोठ्या प्रमाणात असतील, तर आयोग सहाय्यक भाषांमध्ये याद्या तयार करु शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com