Dr. Amol Kolhe, Udayanraje Bhosale
Dr. Amol Kolhe, Udayanraje BhosalePramod Ingale, satara

Dr. Amol Kolhe News : उदयनराजेंच्या भेटीनंतर डॉ. अमोल कोल्हे म्हणाले...तर आयुष्याची मजा संपून जाईल

Udayanraje Bhosale खासदार डॉ. कोल्हे यांनी आज खासदार उदयनराजे यांची त्यांच्या जलमंदिर या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी त्यांनी कऱ्हाड येथे उद्यापासून होणाऱ्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रयोगाचे निमंत्रण दिले.

Dr. Amol Kolhe News : खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale आणि माझे चांगले ऋणानुबंध आहेत. त्यांचा नेहमीच आम्हाला पाठिंबा राहिला आहे; पण सगळ्याच गोष्टीत राजकारण आणले, तर आयुष्याची मजा संपून जाईल. राष्ट्रवादीचा खासदार जर भाजपच्या खासदाराला भेटला असेल, तर नक्कीच राजकारण आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारा एक कलावंत जर महाराजांना भेटला, तर यामध्ये राजकारण होणार नाही, असे स्पष्ट मत खासदार डॉ. अमोल कोल्हे Amol Kolhe यांनी व्यक्त केले. सध्याचे सरकार कधी पडेल यावर मी ज्योतिषी नाही, याविषयी माझा अभ्यास नाही, असे त्यांनी नमूद केले.

खासदार डॉ. कोल्हे यांनी आज खासदार उदयनराजे यांची त्यांच्या जलमंदिर या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी त्यांनी कऱ्हाड येथे उद्यापासून होणाऱ्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रयोगाचे निमंत्रण दिले. या कार्यक्रमासाठी खासदार उदयनराजे यांनी आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती केली.

डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘माझ्या जगदंब क्रिएशनला उदयनराजे भोसले यांचा कायमच पाठिंबा राहिला आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे कऱ्हाड येथे पश्‍चिम महाराष्ट्रात होणारे हे शेवटचे प्रयोग आहेत. त्यानंतर आम्ही विदर्भ, मराठवाड्यात प्रयोग घेणार आहोत. त्यामुळे मी उदयनराजेंना खास निमंत्रण द्यायला आलो होतो.

Dr. Amol Kolhe, Udayanraje Bhosale
Amol Kolhe : खासदार कोल्हेंची उक्ती हेतू पुरस्सरच? चर्चा घडवून आण्याचा उद्देश काय?

उदयनराजे आणि माझे चांगले ऋणानुबंध आहेत. त्यांचा नेहमीच आम्हाला पाठिंबा राहिला आहे. सगळ्याचा गोष्टीत राजकारण आणले तर आयुष्याची मजा संपून जाईल.’’अलीकडे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना तुमची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे, यावर ते म्हणाले, ‘‘माझ्या नाटकाचे जर प्रयोग असतील आणि माझ्या पक्षाचा एखादा कार्यक्रम असेल तर मला उपस्थित राहता येत नाही.

Dr. Amol Kolhe, Udayanraje Bhosale
Satara APMC News : बाजार समितीतील उलट्या सुलट्या गोष्टी बाहेर काढणार; स्वाभिमानी'च्या पाठीशी उदयनराजेंची ताकत

याची सर्व कल्पना मी माझ्या वरिष्ठांना देऊनच हे कार्यक्रम करत असतो. यामध्ये कोणताही गैरसमज करण्याची गरज नाही.’’ सध्याचे सरकार कधी कोसळेल, असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘या विषयावर बोलायला मी ज्योतिष नाही, तसेच याविषयी माझा अभ्यासही नाही.’’

Dr. Amol Kolhe, Udayanraje Bhosale
Satara News : पृथ्वीराज चव्हाणांच्या मागे किती आमदार; त्यांनी आत्मपरिक्षण करावे...शंभूराज देसाई

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये कोणतीही तुलना करण्याची गरज नाही. दोघेही आमच्यासाठी आदरणीय आहेत. पक्षात आमचे नेते शरद पवार सर्व निर्णय घेत असतात. त्यामुळे दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री झाला, तरी आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Dr. Amol Kolhe, Udayanraje Bhosale
BJP News : राऊतांबाबत भाजपचा मोठा निर्णय ; नितेश राणेंवर मोठी जबाबदारी ; ठाकरेंची अनेक गुपितं उघडणार..?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com