Eknath Shinde : लोकसभेतील पराभव कशामुळे झाला? CM शिंदेंनी फडणवीसांसमोर मांडलं गणित

Eknath Shinde On Lok Sabha Election Result : महायुतीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमिमांसा केली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित होते.
Devendra Fdnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fdnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 7 July : देशात पुन्हा मोदी सरकार येणार असं गृहित धरुन महायुतीचा मतदार ऐन मतदानादिवशी मतदान न करता सुटी एन्जॉय करण्यासाठी गेला. त्यामुळे राज्यात आपल्याला कमी जागा मिळाल्या, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

महायुतीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमिमांसा केली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित होते.

राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. या पराभवाची सल अद्याप महायुतीच्या नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळे या पराभवाची कारणमिमांसा युतीच्या नेत्यांकडून केली जात आहे. अशातच आता भाजपच्या (BJP) 400 पारच्या घोषणेमुळे आपल्याला फटका बसल्याचं वक्तव्य शिंदे यांनी केलं.

Devendra Fdnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Raju Shinde: राजू शिंदेंच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे शिंदें गटाचे आमदार शिरसाट यांची डोकेदुखी वाढणार

यावेळी बोलताना मुख्यमंत्री (Eknath Shinde) म्हणाले, "सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत 400 जागा मिळणारच असं महायुतीच्या मतदारांनी गृहित धरलं आणि ते मतदानादिवशी सुट्टी साजरी करण्यासाठी गेले, त्याचा फटका बसला आणि लोकसभेत कमी जागा आल्या. शिवाय विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यात आपले नेते कमी पडले. आपल्याला व्यूहनितीत बदल करण्याची गरज असल्याचं या पराभवातून स्पष्ट झालं आहे."

Devendra Fdnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Video Rahul Gandhi : मोदी-शहांच्या गुजरातमध्ये जाऊन राहुल गांधींनी ठोकला शड्डू, म्हणाले, विधानसभेला...

तर विरोधकांनी मतदानाच्या दिवशी त्यांच्या मतदारांना घराबाहेर काढून जास्तीत जास्त मतदान घडवून आणलं. त्यांच्या 80 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आपले 60 टक्के मतदार जरी पोलिंग बूथवर गेले असते, तर आपण 40 जागा सहज जिंकल्या असत्या असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

त्यामुळे लोकसभेसाठी भाजपकडून 400 पारची घोषणा देण्यात आल्यामुळेच युतीला फटका बसला असं म्हणत शिंदेंनी अप्रत्यक्षपणे भाजपलाच लोकसभेतील खराब कामगिरीसाठी जबाबदार धरल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com