माझ्या-तुमच्यात काय ठरलं होतं? वेळ आल्यावर सांगेन : शिंदेंचा ठाकरेंना इशारा!

Eknath Shinde : ही गर्दी पाहून खरी शिवसेना कुठं आहे याचं उत्तर उभ्या महाराष्ट्रालाच मिळालं आहे.
Eknath Shinde-uddhav thackeray
Eknath Shinde-uddhav thackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेतल्या फुटीनंतर आज मुंबईत दोन दसरा मेळावे पार प़डत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून बीकेसी मैदानात मेळाव्याची तयारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानातही लगबग सुरू आहे. मुंबईत आज जोरदार शक्तीप्रदर्शन दिसत आहे. राज्यभरातू दोन्ही गटाचे समर्थक मुंबईत पोहचले आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू आहे.

मेळाव्याच्या भाषणातून मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आव्हान दिले. शिंदे यांनी ठाकरेंना उद्देशून म्हणाले की, "माझ्या आणि तुमच्यात काय ठरलं हे मी वेळ आल्यावर जाहीर करणार. आम्हाला गद्दार म्हणताय, आम्ही गद्दारी नाही केली तर 'गदर' केला आहे. गदर म्हणजे क्रांती. आम्ही निर्णय घेताना आनंदाने घेतला नाही, आम्हालाही वाईट वाटलं. आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा.

Eknath Shinde-uddhav thackeray
आम्ही गद्दारी नाही तर 'गदर' केला, म्हणजे क्रांती; मुख्यमंत्र्याचे प्रत्युत्तर!

'मीच ग्रामीण भागातील आमदारांना भेटायचो, बाकी कुणीही नाही. पराभूत उमेदवारांना राष्ट्रवादी-काँग्रेस ताकत द्यायचे .मी हे ठाकरेंना सांगितलं. ही गर्दी पाहून खरी शिवसेना कुठं आहे याचं उत्तर उभ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला मिळालं आहे," असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बीकेसी मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, सून आणि नातू उपस्थित राहिले. यामुळे माध्यमांमध्ये या गोष्टीची जोरदार चर्चा झाली. बाळासाहेबांचे पुत्र जयदेव ठाकरे, सून स्मिता ठाकरे आणि नातू निहार ठाकरे हे एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्यात उपस्थित राहिले. यावेळी जयदेव ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदेंना एकटं पडू देवू नका. त्यांना एकनाथ राहू द्या. शिंदेंशाही आली पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com